आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांमकाचे पाणी १४ हजार क्युसेक वेगाने सोडले, आज जायकवाडीत येणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- जायकवाडी धरण क्षेत्रात सोमवारी तब्बल दीड महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली असली तरी या पावसाच्या पाण्याने धरणात काही वाढ होत नसून वरील धरणातून पाणी आले तरच जायकवाडीत वाढ होण्यास सुरू होते. आज नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नांदूर-मधमेश्वर या धरणातून गोदावरी नदीपात्रात १४ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले असून हे पाणी जायकवाडीत मंगळवारी दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोड यांनी दिली. 


जायकवाडी धरणात सध्या १८ टक्के पाणीसाठा असून धरणाच्या वरील भागातही पावसाने दांडी मारली होती. मात्र, दोन दिवसांपासून नाशिक भागात जोरदार पाऊस झाल्याने सोमवारी दुपारी ४ वा. नांदूर-मधमेश्वर धरणातून १४ हजार क्युसेक वेगाने गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...