आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठातील विद्यार्थ्यांना टँकरद्वारे पाणी पुरवण्याचा प्रशासनाचा निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पिण्याच्या पाण्यासह बांधकाम, बागकाम आणि वापरण्याच्या पाण्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. परीक्षांच्या काळातच विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना बाटलीभर पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी १५ मेपर्यंत विद्यार्थ्यांना टँकरद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. 


विद्यापीठातील ११ वसतिगृहे, ५२ शैक्षणिक विभाग, वाचनकक्ष आणि प्रशासकीय इमारतीत पिण्यासह वापरण्यासाठीही पाणी नाही. गुरुवारी दिवसभर ग्रंथालय आणि वाचनकक्षातील विद्यार्थी, कर्मचारी हातात बाटल्या घेऊन विविध शैक्षणिक विभागांत घोटभर पाण्यासाठी शोध घेत होते. वॉटर कुलरच्या पाण्यासाठी गर्दी : मानव्य विद्याशाखेतील इमारतीमधील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रा शेजारील वॉटर कुलरमध्ये पाणी होते. येथे विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. ग्रंथालय, अभ्यासिका, प्रशासकीय इमारतीमधील एकाही ठिकाण पिण्याचे पाणी नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृह क्रमांक-१, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या वसतिगृहांत पिण्याचे पाणी उपलब्ध होते. शहीद भगतसिंग वसतिगृहात अनेक महिन्यांपासून पिण्याचे पाणी नाही. 


हयगय केली तर कारवाई करू 
विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे १५ मे पर्यंत लागेल तेवढे पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. वसतिगृहांत पाणी आहे की, नाही हे पाहण्यासाठी दिवसभरात तीन वेळा जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. गरज असेल तिथे खासगी टँकर मागवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होईल.
- डॉ. अशोक तेजनकर, प्र-कुलगुरू 

बातम्या आणखी आहेत...