आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड बायपासवर वेगमर्यादा किती? शास्त्रशुद्ध साइन बोर्डच नाहीत!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अपघातांमुळे कायम चर्चेत असलेल्या बीड बायपास रोडवर झाल्टा फाटा- एएस क्लब ते महानुभाव आश्रम चौक या २१.८ किलोमीटरच्या अंतरात ताशी ४० किलोमीटर वेगमर्यादा असल्याचे सांगितले जाते. मात्र, वाहनधारकांना तसे स्पष्टपणे लक्षात येणारे शास्त्रशुद्ध साइन बोर्डच लावण्यात आलेले नाहीत. या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी मंगळवारपासून पायलटिंग सुरू केले खरे, परंतु वाहतूक सुरक्षेच्या मूळ पायाभूत सुविधा पुरवण्याकडे वर्षानुवर्षे पद्धतशीर दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळेच हा रस्ता 'मृत्यूचा महामार्ग' बनला असून 'डीबी स्टार'ने वृत्तमालिकेतून त्याकडे सातत्याने लक्ष वेधले आहे. 


हे कसले साइन बोर्ड? 
देवळाई चौक ते एमआयटी या ३ किलोमीटरच्या अंतरात सर्वाधिक अपघात होतात. या अंतरात पोलिसांनी वेगमर्यादेचे तीन फलक लावले. मात्र, ते शास्त्रशुद्ध नसून जाहिरातीच्या किऑक्ससारखेच आहेत. परिणामी वाहनधारक त्याकडे पाहत नाहीत. 


साइन बोर्डचा नियम असा 
वाहतूक सुुरक्षेच्या नियमाप्रमाणे जिथून वाहतूक मर्यादा सुरू होते तेथे पहिला साइन बोर्ड असावा. त्या पहिल्या बोर्डपासून निर्धारित वेगमर्यादा संपेपर्यंत प्रत्येक ११०० फूट अंतरावर हा शास्त्रशुद्ध साइन बोर्ड लावणे अनिवार्य आहे. 


आता पोलिस म्हणतात, आठ दिवसांत लावू 
या मूळ सुविधेच्या अभावाकडे 'दिव्य मराठी'ने लक्ष वेधले असता पोलिस उपायुक्त दीपाली धाटे- घाडगे म्हणाल्या, 'आठ दिवसांत या मार्गावर साइन बोर्ड लावू. संबंधित विभागाशी पत्रव्यवहार सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...