आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमविवाहानंतर पत्नीचा छळ, सासऱ्यांना अॅट्रॉसिटीची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कुटुंबीयांचा विरोध झुगारून तिने प्रेमविवाह केला, पण काही दिवसांतच पतीसह सासरच्यांनी पैशासाठी छळ सुरू केला. पैसे दिले नाहीत तर तुझ्या आईवडिलांवर अॅट्रॉसिटी दाखल करू, अशी धमकीही पतीने दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विवाहितेने महिला तक्रार निवारण विभागाकडे तक्रार देताच पुंडलिकनगर पोलिसांनी पतीसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल केला. 


काही वर्षांपूर्वी तरुणीचे सत्यम नवघरे यांच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. परंतु आंतरधर्मीय असल्याने तरुणीच्या कुटुंबीयांनी विवाहास विरोध केला. तो झुगारून तरुणीने २०१३ मध्ये आर्य समाज पद्धतीने विवाह केला. त्यांना मुलगीही झाली. मग मात्र, छळ सुरू झाला. विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे, सासरच्या मंडळींनी मारहाण सुरू केली. तसेच तिने माहेराहून सात लाख रुपये आणावेत यासाठी दबाव टाकला जाऊ लागला. त्यास तरुणीसह व तिच्या आईवडिलांनी नकार देताच आरोपींनी अॅट्रॉसिटीअंतर्गत तक्रार देऊ, असे धमकावले. त्यानंतर मात्र तरुणीने तक्रार दिली. त्यानुसार सत्यम नवघरे, मोतीराम नवघरे, शिवम नवघरे, सुंदरम नवघरे व एका महिलेविरोधात छळ व अत्याचार कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचे तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल विष्णू मुंढे यांनी सांगितले. 


सुशिक्षित कुटुंब तरीही 
पोलिसांच्या माहितीनुसार, विवाहिता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सत्यम नवघरे याचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्याचे वडीलही शासकीय नोकरीतून निवृत्त झाले आहेत. त्यांनी सात लाखांसाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. विवाहिता माहेरी वास्तव्यास असून तिचे वडील खासगी नोकरी करतात. 

बातम्या आणखी आहेत...