आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड- धावत्या एसटी बसमध्ये महिलेची प्रसूती, उपचाराआधीच बाळाचा झाला मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- प्रसूती कळा सुरु झाल्याने जिल्हा रूग्णालयात घेवून येत असलेल्या गर्भवती महिलेची चालत्या बसमध्येच प्रसूती झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान तालुक्यातील जरूड येथे घडली. सोबत असलेली आशा कार्यकर्ती व बसमधील महिला प्रवाशांनी प्रसूती केली. इतर प्रवाशांनी जिल्हा रुग्णालयाला ही माहिती कळवल्यावर नाळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका व रुग्णावाहिका जरुड फाट्यावर पाठवण्यात आली. महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेल परंतु, तत्पूर्वीच बाळाचा मृत्यू झाला होता. 


दोन दिवसंपूर्वी प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या या महिलेला गुरूवारीच प्रसूतीसाठी आणखी दहा दिवसांचा अवधी असल्याचे सांगत सुट्टी देण्यात आली होती. 

वर्षा व्यंकटी देवकते या केज तालुक्यातील रहिवासी आहेत. बाळंतपणासाठी त्या माहेरी बीड तालुक्यातील हिवरापहाडी येथे आल्या होत्या. पोटात दुखू लागल्याने प्रसूतीसाठी तीन दिवसापूर्वीच जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. परंतू, प्रसूतीसाठी अद्याप दहा दिवसांचा अवधी असल्याने गुरुवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. गावी गेल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांना प्रसूती कळा सुरु झाल्या. 

आई इंदू पालवे, गावातील आशा कार्यकर्ती मिना गिरी या वर्षा हिला हिवरापहाडी-बीड या बसमधून(क्र. एम.एच. २० डी. ८३६३) जिल्हा रूग्णालयात घेवून येत होते. मात्र वाटेतच जरूडजवळ वर्षा यांची दुपारी बारा वाजेच्या दरम्यान चालत्या बसमध्ये प्रसूती झाली. मिना गिरी, इंदु पालवे व इतर सहप्रवाशी महिलांनी वर्षा यांची बसमध्येच प्रसूती केली. वर्षाने मुलाला जन्म दिला. दरम्यान, इतर काही प्रवाशांनी आराेग्य विभागाला याची माहिती दिल्यानंतर नाळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यीका यांना रुग्णवािहका घेऊन तत्काळ जरुड फाट्यावर जाण्याच्या सूचना तालुका वैद्यकीय अधिकारी नरेंद्र कासट यांनी दिल्या. वर्षा व बाळावर प्रथमोपचार करुन रुग्णवाहिकेेतून बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

 

बाळ दगावले

जिल्हा रुग्णालयात बाळ व मातेला दाखल करण्यात आल्यानंतर बालरोगतज्ज्ञांनी बाळाची तपासणी करुन ते मृत झाल्याचे सांगितले तर वर्षा यांच्यावर प्रसूती कक्षात उपचार सुरु आहेत. दरम्यान, बाळ जन्मतानाच मृत्यू पावले होते की त्याला वेळेत आरोग्य सुविधा न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला याबाबत आता आरोग्य विभागाकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...