आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: भरधाव ट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार; काका, पुतणी जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- काकू व पुतणीसह दुचाकीने नातेवाइकांना भेटण्यासाठी जाणाऱ्या तरुणाला पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात ट्रकखाली सापडलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तरुण व लहान मुलगी किरकोळ जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास बीड बायपासवरील गोदावरी टी पॉइंटजवळ झाला. प्रयागबाई बाजीराव राठोड (४५, रा. गाडीवाट) असे मृत महिलेचे नाव आहे. तर त्यांचा पुतण्या साईनाथ राठोड (३०) आणि नात सुप्रिया सुनील राठोड (३) हे जखमी झाले. 


साईनाथ राठोड हा काकू व पुतणीसह बीड बायपास परिसरातील भारतमातानगरातील एका नातेवाइकांना भेटण्यासाठी अाला होता. त्यांना भेटून झाल्यानंतर गिरनेर तांडा येथे विहिरीचे खोदकाम करणाऱ्या प्रयागबाई यांचा मुलगा नितेश याच्याकडे जायचे ठरले. त्यानुसार सर्वजण दुचाकीने जात होते. या वेळी गोदावरी टी पॉइंटजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात प्रयागबाई ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्या, तर साईनाथ आणि सुप्रिया रस्त्याच्या डाव्या बाजूला फेकल्या गेले. यात त्यांना किरकोळ मार लागला. मात्र, प्रयागबाई यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सातारा ठाण्याचे निरीक्षक भारत काकडे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना घाटीत दाखल केले. घटनेचा पंचनामा करत पोलिसांनी ट्रक चालक शेख बाबू (५०, रा. बीड) याला अटक करून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...