आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१८०४ मध्ये जगाची लोकसंख्या होती १०० कोटी, दुप्पट होण्यास लागली सव्वाशे वर्षे, ९१ वर्षांत चौपट वाढून ७६३ कोटी झाली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगाची लोकसंख्या १०० कोटी होण्यास २ लाख वर्षे लागली, मात्र केवळ २०० वर्षांत ७०० कोटींवर गेली. पृथ्वीवर १८०४ मध्ये शंभर कोटी लोक होते. अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीनुसार एवढी लोकसंख्या होण्यास सुमारे दोन लाख वर्षे लागली. मात्र, नंतरचे १०० कोटी १३० वर्षांत वाढले. नंतरच्या ३३ वर्षांत, त्यानंतर १४ वर्षांत नंतर १५ वर्षांत (१९८९) वाढले. जगात औद्योगिकीकरण वाढत गेले तशी लोकसंख्या वाढली. मात्र, आता दर मंदावल्याने सध्याच्या दराने लोकसंख्या दुप्पट होण्यास २०० वर्षे लागतील.


का : ५०० कोटी झाल्यावर
११ जुलै १९८९ रोजी जगाची लोकसंख्या ५०० कोटी झाली. यूएनने लोकसंख्येबाबत जागरूकता वाढावी म्हणून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन घोषित केला.
परिणाम : दर ०.७% घटला
१९८९ मध्ये वाढीचा हा दर १.७९ होता. आता १.०९% आहे. म्हणजे लोकसंख्या दिन सुरू झाल्यानंतर दर ०.७ % कमी. यूएननुसार २०५०पर्यंत दर ०.५६% होईल.


...आणि या वेळची थीम कुटुंब नियोजन
आज ५० वर्षांपूर्वी १९६८ मध्ये तेहरानमध्ये मानवाधिकारावर संमेलनात प्रथमच कुटुंब नियोजनाला मानवाधिकाराचा दर्जा मिळाला. म्हणून यूएनने जागतिक लोकसंख्या दिनाची थीम कुटुंब नियोजन ही ठेवली.


आज ही लोकसंख्या काय करते आहे?
- 197 काेटी 15 वर्षांच्या आतील
- 170 काेटी सेवा क्षेत्रात 
- 149 काेटी शेती क्षेत्रात
- 89 काेटी कारखान्यांत
- 58 काेटी 64 वर्षापेक्षा अधिक वयाचे
- 51 काेटी बेरोजगार
- 46 काेटी उद्योजक

बातम्या आणखी आहेत...