आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीचे निदान; डॉक्टरवर गुन्हा दाखल करावा; पीडित रुग्णाची फुलंब्री पोलिसांकडे मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री- शहरातील एका हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी भेट देणाऱ्या एका  डॉक्टरानी रुग्णाला ‘तुला एक तासाच्या आत हृदयविकाराचा तीव्र झटका येणार आहे’ असे म्हणून फसवणूक  केली. त्यापोटी मला विनाकारण मानसिक त्रास देऊन माझी अार्थिक लुबाडणूक करण्यात आलेल्या डॉक्टरावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी फुलंब्री पोलिस ठाण्यात तक्रार देऊन रुग्णाने केली आहे.  


तालुक्यातील किनगाव येथील देवनाथ भिकाजी  सोनवणे यांना अॅसिडिटीचा त्रास होऊ लागल्याने ते फुलंब्री येथील गाडेकर हॉस्पिटलमध्ये डॉ. मनोज गाडेकर यांच्याकडे उपचारासाठी गेले. डॉ. गाडेकर यांनी आपल्याकडे औरंगाबाच्या रामकृष्ण हॉस्पिटलचे डॉ. जैस्वाल हे हृदयरोगतज्ज्ञ आलेले आहे. तुम्ही त्यांना दाखवून घ्या, असे सांगितले. त्यानंतर डॉ. जैस्वाल यांनी वरच्यावर निदान करून ‘तुला एक तासाच्या आत हृदयविकाराचा तीव्र झटका येणार आहे. त्यासाठी माझ्या किंवा इतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट हो’ असे सांगितले. 


घाबरून जाऊन सर्व नातेवाईक व गावातील प्रतिष्ठित मंडळींना डॉक्टरने सांगितलेली माहिती सोनवणे यांनी फोनवरून दिली. दोन तासांच्या काळात औरंगाबाद येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या झाल्या. परंतु  सर्व काही रिपोर्ट नॉर्मल दाखवण्यात आले. या सर्व प्रकरणात माझी २० हजारांची अार्थिक फसवणूक झाली. मला मानसिक त्रास झाला. याबाबत डॉ. गाडेकर यांच्याकडे जाऊन डॉ. जैस्वालबद्दल विचारणा केली असता जैस्वाल व माझा संबंध नाही. त्यांना काय करायचे ते करा असे सांगितले, असे  सोनवणे यांनी तक्रारीत  म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...