आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोळखी व्यक्तीला मोबाइल दिला तर वीस सेकंदांमध्ये तुमचा पूर्ण डेटा होऊ शकतो कॉपी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मोबाइलवरून फेक कॉल करून एटीएम, क्रेडिट कार्डवरून पैसे काढून घेतल्याच्या घटना वारंवार घडतात. आता यापुढे जाऊन हॅकर्सनी एक नामी युक्ती शोधून काढली आहे. तुम्ही जर एखाद्या अनोळखी व्यक्तीला तुमचा मोबाइल दिला तर अवघ्या वीस सेकंदांत तो सर्व डेटा कॉपी करून घेऊ शकतो. रविवारी सीए परिषदेच्या समारोपात दिल्लीच्या हॅकरने याचे प्रात्यक्षिक करून दाखवताच ८०० विद्यार्थ्यांसह सीएंना धक्का बसला. पण त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण टिप्स दिल्यानंतर सभागृहाने टाळ्या वाजवून त्यांना धन्यवादही दिले. 


वीस सेकंदांत केला बाबांचा मोबाइल हॅक
दिल्ली येथील सायबर क्युअर टेक्नॉलॉजीचे उपाध्यक्ष संगीत चोप्रा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ते एथिकल हॅकर आहेत. सीएच्या अभ्यासक्रमात सायबर सिक्युरिटी नावाचा पाठ आहे. त्यात त्यांनी विद्यार्थांना मोबाइल हॅक कसा होतो याचे प्रात्यक्षिक दाखवले. गर्दीने खचाखच भरलेल्या विद्यार्थ्यांच्या सभागृहातून एकाला मंचावर बोलावले. कॉल करण्यासाठी त्याचा मोबाइल मागितला अन् त्यानेही अनलॉक करून तो चोप्रा यांच्या हातात दिला. जादूगाराप्रमाणे त्यांनी काही सेकंद विद्यार्थ्याला गप्पात रंगवले. वीस सेकंदानंतर चोप्रा यांनी रिंग दिल्यानंतर त्याच्या मोबाइलवर वडिलांचा कॉल आला. वडील बोलत असल्याचे सांगून हॅकरने त्याला पंधरा हजार मागताच सर्व जण आश्चर्यचकित झाले. 

 

ही काळजी घेतल्यास हॅक होणार नाही मोबाइल 
- अनोळखी व्यक्तीच्या हातात तुमचा मोबाइल देऊ नका. 
- फक्त पाहण्यासाठी मागितला तर लॉक करून द्या. 
- गेस्ट मोडवर टाकूनच मोबाइल अनोळखी व्यक्तीला द्या. गेस्ट मोड प्रत्येक मोबाइलमध्ये असतो. तो ऑन केल्यास तुमचा डेटा हॅक होऊ शकत नाही. हे सेफ्टी फीचर आहे. 
- तुमचा ओटीपी कुणालाही देऊ नका. तो हाती लागला की बँक बॅलन्स रिकामे झालेच समजा. 
- गुगल ड्राइव्ह, फेसबुकचा डेटा सहज चोरी होतो. 
- गुगल ड्राइव्ह,फेसबुक खूप सेफ आहे असे वाटते. पण तो डेटा चोरणे सहज शक्य अाहे. त्यासाठी कोणताही पासवर्ड मोबाइलमध्ये स्टोअर करू नका. 
- बँक अकाउंट नंबर, आॅनलाइन बँकिंगचे पासवर्ड तुमच्या मोबाइल मध्ये कधीच स्टोअर करू नका. 
- मोबाइलमध्ये स्पायवेअर आणि मोबाइल ट्रोजन प्रकारात शेकडो हॅकिंग अॅप्स उपलब्ध आहेत, त्यांची नावे सांगणे कायद्याच्या दृष्टीने चुकीचे आहे. 


डेटा काॅपी करून दाखवला माेठ्या पडद्यावर
अवघ्या वीस सेकंदांत हॅकर चोप्रा यांनी त्यांच्या मोबाइलवर विद्यार्थ्याच्या फोनमधील डेटा कॉपी केला. त्यांनी तो सभागृहात मोठ्या पडद्यावर दाखवला. यात बँकेत केलेला व्यवहारही दिसला. सर्व ओटीपी दिसले. हा प्रकार पाहून विद्यार्थी आणि ज्येष्ठ सीए अवाक् झाले. 


असा होतो मोबाइल हॅक 
चोप्रा यांनी सांगितले की, कोणताही मोबाइल कोणालाही सहजपणे हॅक करता येतो. स्पायवेअर नावाने असे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. एखाद्याच्या मोबाइलमधून या अॅपला क्लिक केले की तो मोबाइल कंपनीच्या सर्व्हरशी कनेक्ट होतो आणि अवघ्या वीस सेकंदांत मोबाइलमधला डेटा कॉपी हाेतो. पुढे हॅकर याचा दुरुपयोग करू शकतो. यामुळे योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

 

बातम्या आणखी आहेत...