आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण कार्यालयात तरुणाचा गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- घरावर कब्जा केलेल्या भाडेकरूला दिलेली वीजजोडणी खंडित करण्याच्या मागणीसाठी शेख मोबीन शेख नूर महंमद या तरुणाने झोपेच्या गाेळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी दुपारी महावितरणच्या मुख्य कार्यालयात हा प्रकार घडला. 


मोबीनचे पडेगावात घर आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ते घर भाड्याने दिले होते. परंतु भाडेकरूनेच घरावर कब्जा केल्याचा आरोप मोबीनने करत त्यांना दिलेला स्वतंत्र वीजपुरवठा खंडित करण्यासाठी २५ एप्रिल २०१८ रोजी अर्ज केला होता. त्यानुसार महावितरणने जोडणी बंद केली. २३ मे २०१८ रोजी शेख अब्दुल राजीख अब्दुल रहीम(प्लॉट क्र. ९८, अन्सार कॉलनी) यांनी ही जागा खरेदी केल्याची इसार पावती जोडून नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज केला. महावितरणच्या मते, कायद्याने नंतर शेख अब्दुल यांना ९ मे जून रोजी नवीन कनेक्शन दिले. हे कनेक्शन खंडित करा म्हणून मोबीन याने शुक्रवारी सकाळी अधिकाऱ्यांशी वाद घातला व झोपेच्या १० गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी सिटी चौक पोलिसांना कळवल्यावर त्याला ताब्यात घेतले. प्रदीप राजेभोसले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मोबीन विशेष पोलिस अधिकारी असल्याचे समजते. 

बातम्या आणखी आहेत...