आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवे मारण्याची धमकी, तरुणाची आत्महत्या; चार जणांविरुद्ध गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोड- महिन्याभरापूर्वी झालेल्या मित्रांच्या वादात, पोलिसांत तक्रार का दिली म्हणून धमकावल्याने एका सत्तावीस वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पाचोड येथे गुरुवारी  मध्यरात्री उघडकीस आली. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन जणांना ताब्यात घेतले. रामेश्वर किसन भोजने (२७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.   


पाचोड येथील रामेश्वर किसन भोजने हा  १० जून रोजी पाचोड येथील एका हॉटेलमध्ये टीव्ही पाहत असताना गावातील अमोल बळीराम डुकळे हा दारू पिऊन तेथे आला दुचाकीची चावी मागण्याच्या कारणावरून अमोल याने रामेश्वर यास शिवीगाळ करत, फायबर खुर्चीने डोक्यावर, डोळ्यावर, तोंडावर गंभीर इजा केली होती. दरम्यान या प्रकरणी पाचोड ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता.   


त्याचाच राग मनात धरून बुधवारी  रामेश्वरला अमोल बळीराम डुकळे, अजय बळीराम डुकळे, रवी मिठू काळे, संतोष मिठू काळे या चार जणांनी आमची पोलिस ठाण्यात तक्रार का केली म्हणून शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. सायंकाळी वडील किसन भोजने शेतातून घरी आले असता, मुलगा रामेश्वर नाराज असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी त्यास कारण विचारले असता, घडल्या प्रकाराबाबत सांगत त्या चौघा जणांनी मला जिवे मारण्याची धमकी दिल्याने मनात भीती निर्माण झाल्याचे रामेश्वरने सांगितले. गुरुवारी  मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास रामेश्वर याने पत्नी व मुले झोपले असल्याचे पाहून पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...