आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राच्या लग्नात नाचताना तरुणाला हृदयविकाराचा झटका, हाॅस्पिटलमध्ये पोहचण्याआधीच झाला मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी- मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत नाचत असताना तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी वडवणी येथे घडली. बालाजी दत्तात्रय पंधारे (वय ३० )असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो हाॅटेल व्यावसायिक होता.

 

वडवणी येथील जिवलग मित्र विश्वजीत फरताडे याच्या लग्नात मिरवणुकीत नाचत असताना दुपारी एक वाजेच्या दरम्यान बालजीच्या छातीत वेदना होऊ लागल्या इतर मित्रांनी त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.


वर्षात दुसरा आघात
वर्षभरापूर्वीच बालाजी यांच्या वडिलांचे निधन झाले होते.त्यांच्यानंतर कुटुंब व हाॅटेल व्यवसायाची धुरा बालाजी यांनी खांद्यावर घेतली होती. वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरत असतानाच पंधारे कुटुंबियांवर दुसरा आघात झाला.

बातम्या आणखी आहेत...