आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ऋचा'च्या 5 युिनटसह धूत कॉम्पॅकचे 15% उत्पादन सौर ऊर्जेवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वाळूज औद्योगिक वसाहतीतील आघाडीची आॅटो कंपनी ऋचा इंजिनिअरिंगच्या पाच युनिटसह पैठण रोडवरील धूत कॉम्पॅक या कंपनीने आपले १५ टक्के उत्पादन सौर ऊर्जेवर सुरू केले. या दोन्ही सौर प्रकल्पांचे उद््घाटन सोमवारी बजाज ऑटोचे उपाध्यक्ष डी. व्ही. रंगनाथन (मटेरियल विभाग) यांच्या हस्ते झाले. 


ऋचा समूह हा बजाज कंपनीचा सर्वात मोठा व्हेंडर आहे. दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचे सुटे भाग या कंपनीत तयार होतात. एम. पी. शर्मा यांच्या अक्षिता असोसिएट कंपनीने हे सौर ऊर्जा पॅनल उभारणीचे काम अवघ्या २३ दिवसांत पूर्ण केले. या कंपनीने ऋचा समूहाच्या पाचही युनिटमध्ये मिळून ८७५ किलो वॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पॅनल बसवले. वर्षभरात यातून १२ लाख २५ हजार युनिटची वीजनिर्मिती होणार आहे. शिवाय विद्युत ऊर्जेतून उत्सर्जित होणारा १२७८ टन कार्बन डायऑक्साइड कमी होईल. प्रकल्पांचे उद््घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी बजाज कंपनीचे उपाध्यक्ष रंगनाथन, ऋचा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक उमेश दाशरथी, धूत कॉम्पॅक समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल धूत, अक्षिता असोसिएटचे संचालक एम. पी. शर्मा, सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, उद्योजक मुकुंद भोगले, मिलिंद कंक, मुनीश शर्मा, मैथिली तांबोळकर यांच्यासह कैलास देशमुख, त्रिविक्रम कुलकर्णी, सुरेश क्षीरसागर, रवी चाबुकस्वार, मोहन रेगे आदी उपस्थित होते. 


मराठवाड्यातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचा दावा 
धूत ट्रान्समिशनच्या फारोळा येथील कारखान्यात ९९७ किलो वॅट ऊर्जेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आला. मराठवाड्यातील हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प असल्याचा दावा अक्षिता असोसिएट या सौर ऊर्जा प्रकल्प तयार करणाऱ्या कंपनीने केला आहे. या प्रकल्पातून वर्षभरात १५ लाख ५७ हजार ७४० युनिट इतकी वीजनिर्मिती होणार आहे. यातून १६०१ टन कार्बनडाय ऑक्साइडचे उत्सर्जन कमी होईल. या दोन्ही प्रकल्पांत अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...