आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेेंद्रा डीएमआयसीत 250 कोटींची नवी गुंतवणूक; चीन, जपानच्या कंपन्या उत्सुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दक्षिण कोरियाच्या ह्युसंग कंपनीने तीन हजार कोटींची गुंतवणूक केल्यानंतर औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीच्या (ऑरिक) शेंद्रा पार्कमध्ये बहुराष्ट्रीय उद्योग आकर्षित होत आहेत. वैद्यकीय उपकरणे तयार करणाऱ्या चीनच्या बाहे या कंपनीने ११० कोटींची, तर बांधकाम क्षेत्रातील उपकरणांची निर्मिती करणाऱ्या जपानच्या एका कंपनीने १५० कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. या दोन्ही कंपन्यांनी अनुक्रमे १० आणि २० एकर अशी एकूण ३० एकर जागेची मागणी केल्याचे ऑरिक सिटीचे सरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले. या वेळी ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, विष्णू लोखंडे आदी उपस्थित होते. 


ह्युसंगचा पायगुण : कोरियाच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील ह्युसंग कंपनीने स्पँडेक्स फायबरनिर्मिती प्रकल्पासाठी तीन हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती. ही कंपनी वस्त्रोद्योगातील सर्वात मोठी कंपनी आहे. ह्युसंगला शंभर एकरचा भूखंडही देण्यात आला असून त्याचे सहा अधिकारी शहरात मुक्कामी आले अाहेत. ह्युसंगमुळे अनेक विदेशी उद्योग ऑरिककडे आकर्षित होत आहेत.   


ह्युसंगला पावसाळ्यापूर्वी सुविधा 

ह्युसंग कंपनीला पावसाळ्यापूर्वी रस्ते, वीज, पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधा पुरवल्या जातील. मे महिन्यात कंपनीकडून बांधकामास सुरुवात होणार आहे. २०१९ च्या मे महिन्यापर्यंत ते पूर्ण करून जूनपासून उत्पादन सुरू करण्याचा मानस ह्युसंगचे व्यवस्थापकीय संचालक लीम यांनी व्यक्‍त केल्याची माहिती पाटील यांनी दिली. या कंपनीचे ५ अधिकारी औरंगाबादेत आले असून बांधकामाचा अाराखडा तयार होत आहे.

बातम्या आणखी आहेत...