आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राचा खून करणाऱ्यास 5 दिवस पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सिडकोतील एन-२ मैदानाजवळ कारने चिरडून मित्राचा खून करणाऱ्या संकेत प्रल्हाद जायभाय (२४ रा. जयभवानीनगर) याला मुकुंदवाडी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

 

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दरम्यान शनिवारी सकाळी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या संकेत कुलकर्णी (१९, रा. पाथरी, जिल्हा परभणी) याचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांना सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात कलम ३०२, ३०७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हारुण शेख यांचे पथक या प्रकरणाचा तपास करीत आहे. त्यांनी संशयित आरोपी संकेत जायभाय याचा जबाब नोंदवला आहे. घटना घडली तेव्हा गाडीत संकेतसोबत अजून तीन ते चार मित्र असल्याचे तपासात समोर आले आहे.


पोलिसांचे आवाहन
या खून प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यांच्याकडे तो असेल त्यांनी ९४०४०४३०३० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवून द्यावा. संबंधिताचे नाव व ओळख गुप्त ठेवलीे जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.