आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गाडीवाट तलावात बुडून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. २४ तासांनंतर म्हणजे रविवारी पाचच्या सुमारास मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले. रफिक शफिक शेख (२८, रा. झाल्टा) असे त्याचे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. 


रफिक कुटुंबीयांसह गाडीवाट येथे रिसेप्शनसाठी आला होता. शनिवारी दुपारी तो मित्र व नातलगांसह तलावावर पोहण्यासाठी गेला. तलावाच्या मध्यभागी रफिक गटांगळ्या खात असल्याचे पाहून मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी ठरल्याने कुटुंबीयांना कळवण्यात आले. कुटुंबीय, ग्रामस्थांसह व अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी आले. त्यांनी शनिवारी रात्री नऊपर्यंत तलावात शोधमोहीम राबवली. परंतु त्यांना यश आले नाही. 


दुसऱ्या दिवशी सकाळपासून पुन्हा शोध घेतला असता दुपारी पाचच्या सुमारास रफिकचा मृतदेह सापडला. तोपर्यंत पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले घटनास्थळीच होते. माजी उपसरपंच मजिद पटेल यांनीही शोधकार्यात मदत केली. रफिकचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्याला मुलगा आणि मुलगी आहे. तो कंपनीत कामगार म्हणून काम करत असल्याचे नातलगांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...