आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार प्रशांत बंब यांच्यावर स्वपक्षीय आमदारांचेही ब्लॅकमेलिंगचे आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद, नागपूर- भाजपचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब हे अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, त्यांच्या चौकशा लावून त्यांना ब्लॅकमेल करतात, असा आरोप काँग्रेस, शिवसेनेसह आता भाजपच्या आमदारांनीही केले आहेत. त्यामुळे अडचणीत आलेले आमदार बंब यांनी माझे कोणतेही आरोप खोटे ठरवून दाखवा, असे आव्हान या आमदारांना दिले आहे. 


विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना आमदार संजय शिरसाट आणि भाजपचे आमदार मोहन फड यांनी प्रामुख्याने बंब यांच्यावर ते अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करत असल्याने अधिकारी वर्ग काम करेनासा झाल्याचा आरोप केला. या परिस्थितीत आमच्या भागात कंत्राटदारही काम करायला येत नाहीत. आमदार बंब यांनी भ्रष्टाचार जरूर बाहेर काढावा. मात्र, वारंवार तक्रारी करून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करू नये, असाच या आमदारांचा सूर होता. काँग्रेसचे एक आमदारही या वेळी उपस्थित होते. या आरोपांमुळे आमदार बंब अडचणीत आले आहेत. या आरोपांवर एका वाहिनीशी बोलताना आमदार बंब यांनी अारोप फेटाळून लावले. माझे कोणतेही आरोप खरे ठरवून दाखवा, असे आव्हान त्यांनी या आमदारांना दिले. आपण प्रत्येक प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे अधिकारी निलंबित झाले. 

बातम्या आणखी आहेत...