आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार अपत्ये दगावल्यानंतर राजमाता जिजाऊंच्या पोटी झाला शिवाजी महाराजांचा जन्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज राजमाता जिजाऊ यांचा स्‍मृतिदिन (तारखेनुसार) आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान राजा घडवणा-या जिजाऊ मॉंसाहेबांचे स्‍वराज्‍यात मोठे योगदान आहे. शिवबा, अफझलखानाच्या भेटप्रसंगी तुम्ही कामी आलात तर भीती बाळगू नका. तुमच्या पाठीमागे मी बाळशंभूस छत्रपती बनवून स्वराज्याची निर्मिती करीन, असा हा निर्धार जागृत ठेवणा-या जिजामातेने शिवरायांना घडवले. राजमाता जिजाऊ स्‍मृतिदिनानिमित्‍त जाणून घेऊया काही खास बाबी..


राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा जिल्हा बुलडाणा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाराणी आणि वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव असे होते. जिजाऊंच्‍या प्राथमिक शिक्षणात युद्ध शिक्षण, राजनीती, भाषा, अनेक खेळ शिकविले गेले. मराठी, फार्सी, संस्कृत, कन्नड, तेलगू, उर्दू, हिंदी अनेक भाषा जिजाऊंना अवगत होत्या. त्यांचा विवाह 1610 मध्ये वेरूळ येथे शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर झाला.


जिजाऊंबाबत महत्‍त्वाच्‍या बाबी...
- डिसेंबर 1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
- वडील लखुजी जाधव व पती शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाल्‍याने पुढे जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत माहेराशी संबंध तोडले होते.
- जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते.
- त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
- जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले.

 

चार आपत्ये दगावल्यानतंर शिवाजी महाराजांचा जन्म....
पहिला मुलगा संभाजी नंतर जिजाऊंना 4 मुले झाली; चारही दगावली. त्यानंतर 7 वर्षाचा काळ निघून गेला व 19 फेब्रुवारी 1630 ला सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवण्‍यात आले.
- शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली.
- जिजाबाई राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत.
- शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून बारा दिवसांनी 17 जून, 1674 ला जिजाबाईंनी शेवटचा श्वास घेतला.

बातम्या आणखी आहेत...