आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलंब्री नगर पंचायत निवडणुकीत भाजपची सरशी, आघाडीची घसरण; शिरसाठ नगराध्यक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री- फुलंब्री नगर पंचायतसाठी झालेल्या पहिल्या ऐतिहासिक निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यात भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुहास शिरसाठ हे १९० मतांनी विजयी झाले, तर सदस्यांच्या १७ पैकी ११ जागेवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत, तर ५ जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या आघाडी, १ जागा  एमआयएम पक्षाने मिळवली आहे. यामुळे भाजपने नगराध्यक्षांसह ११ जागेवर विजय मिळवत  फुलंब्री नगर पंचायतीवर आपला झेंडा फडकविला आहे.    


फुलंब्री नगर पंचायतची निर्मिती १० जून २०१५ रोजी करण्यात आली होती. फुलंब्री नगर पंचायत पहिली निवडणूक प्रामुख्याने भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या फुलंब्री विकास आघाडी यांच्यात लढविली गेली. शहरात एकूण १७ वाॅर्ड असून एकूण मतदारांची संख्या १४,१२४  आहे. फुलंब्री नगर पंचायतीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत १३ डिसेंबर रोजी फुलंब्रीकरांनी तब्बल ७५ टक्के (१०६१३) मतदान केले.  नगर पंचायत विधानसभेचे अध्यक्ष व भाजप आमदार हरिभाऊ बागडे व भाजपचे प्रदेश अध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात असल्याने या पहिल्याच निवडणुकीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या, तर सिल्लोडचे आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार व फुलंब्रीचे माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फुलंब्री नगर पंचायत आघाडीच्या ताब्यात यावी यासाठी जोरदार प्रयत्न चालविला होता, परंतु आजच्या निवडणूक निकालाने भाजपने पुन्हा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीप्रमाणे नगर पंचायतवर नगराध्यक्षांसह ११ जागा मिळवत भाजपचा झेंडा फडकावला आहे. या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुहास शिरसाठ यांना ५३१६ मते पडली आहेत तर  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आघाडीचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांना ५१२६ मते मिळाल्याने त्यांचा केवळ १९० मतांनी पराभव झाला आहे. वाॅर्ड क्रमांक १५ मधील भाजपचे उमेदवार अजय शेरकर सदस्यांमध्ये सर्वात जास्त मतांनी विजयी झाले असून त्यांना ४७० तर त्यांचे प्रतिस्पर्धी आघाडीचे उमेदवार यांना १०८ मते मिळाल्याने शेरकर हे तब्बल ३६२ मतांनी विजयी झाले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फुलंब्री नगर पंचायतीत विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे...

बातम्या आणखी आहेत...