आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेस जाळून मारल्याप्रकरणी पतीस जन्मठेप, सासरचे अन्य मुक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - विवाहितेस जाळून मारल्याप्रकरणी सासू, सासरे, दीर आणि नणंदेची निर्दोष मुक्तता करून पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुनील देशमुख व न्या. संगीतराव पाटील यांनी पती काशीनाथ भटा धनगर (३२, रा. मालपूर ता. सिंदखेडा, जि. धुळे) यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


काशीनाथ धनगर याच्याशी रेखाबाईचा १९९३ मध्ये विवाह झाला. रेखाचा सासरा भटा धनगर हा तिला शेळी मेंढी पालन व्यवसायासाठी पन्नास हजारांची मागणी करत होता तर पती दारू-पत्त्यासाठी माहेराहून पैसे आणण्यास सांगत होता.


पती काशीनाथ, सासरा भटा धनगर, सासू जिजाबाई धनगर, दीर संजय धनगर व नणंद रेखा ऊर्फ चंद्रभागाबाई धनगर यांनी २१ नोव्हेंबर २००१ रोजी रॉकेल टाकून तिला पेटवून दिल्याने तिचे दुसऱ्या दिवशी तिचे निधन झाले. तिच्या जबाबावरून दोंडाईचा ठाण्यात ५ जणांविरोधात प्रारंभी भादंवि कलम ३०७ व ४९८ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. निधनानंतर कलम ३०२ दाखल केले. धुळे सत्र न्यायालयात १३ साक्षीदार तपासण्यात आले. खून केल्याचे सिद्ध करण्यास अपयश आल्याने पाचही जणांना आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. या विरोधात शासनाने खंडपीठात अपील केले. सुनावणीत सहायक सरकारी वकील संदीप मोरमपल्ले यांनी विवाहितेचे मृत्युपूर्व जबाब खंडपीठासमोर ठेवून तिचा खून केल्याचे स्पष्ट होते, असा युक्तिवाद केला.

बातम्या आणखी आहेत...