आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्य तृतीयेला एटीएममध्ये खडखडाट; जिल्हा प्रशासनही स्थितीबद्दल अनभिज्ञ; नागरिकांची \'अर्थभटकंती\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- देशभरात एटीएममध्ये खडखडाटामुळे 'नाेटबंदीसदृश' स्थिती निर्माण झालेली असतानाच नाशिकमध्येही नाेटांच्या टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दाेन दिवसांपासून पहायला मिळते अाहे. बुधवारी (दि. १८) तर एेन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीसाठी निघालेल्या अनेक नाशिककरांना याचा प्रकर्षाने अनुभव अाला. राष्ट्रीयीकृत अाणि खासगी बँकांचीही एटीएम रिती असल्याने अनेकांना भरउन्हात एका एटीएममधून दुसऱ्या एटीएमकडे पळत फिरावे लागत हाेते. क्रेडिट व डेबिट कार्डचा वापर करूनच बहुतांश ग्राहकाना खरेदी करावी लागली. मात्र, किरकाेळ खरेदी करताना त्रास झालाच. 


जिल्ह्यासह शहरात नाेटबंदीनंतर दुसऱ्यांदा याप्रकारे एटीएम रिकामी असल्याने नागरिकांना पैशांसाठी वणवण करावी लागल्याचे पहायला मिळाले. 'दिव्य मराठी'ने ग्रामीण भागात मंगळवारी केलेल्या पाहणीमध्ये ७० टक्के, तर बुधवारी शहरात केलेल्या पाहणीत किमान ५० टक्के एटीएम बंद असल्याचे दिसून अाले. महत्त्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या मेनराेड, रविवार कारंजा, काॅलेजराेड, गंगापूरराेड, रेडक्राॅस सिग्नल, नेहरू गार्डन या परिसरात ही स्थिती पहायला मिळाली. विशेष म्हणजे एटीएममध्ये पैसे नसल्याचे किंवा ते कार्यान्वित नसल्याचा फलक लावण्याचे साैजन्यही अपवादानेच दिसले. त्यामुळे पैसे काढण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर एटीएमच्या स्क्रिनवर 'नाेटा उपलब्ध नाहीत, दुसऱ्या नजीकच्या एटीएमवर व्यवहार करा', 'टेम्पररी अाउट अाॅफ सर्व्हिस',' टेम्पररी अनएबल टू डिस्पेन्स कॅश' यासारखे मेसेज झळकत असल्याने ग्राहकांच्या मन:स्तापात अधिकच भर पडली.

 
जिल्हाधिकारी घेणार माहिती 
एटीएममध्ये खडखडाट असल्याबाबत 'दिव्य मराठी'ने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 'याबाबत सध्या माझ्याकडे माहिती नसून बँकांकडून तत्काळ ती घेतो', असे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...