आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्यातून पुन्हा मंगळसूत्र हिसकावले, महिन्यातील दहावी घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सातारा परिसरातून दुचाकीने जाणाऱ्या संध्या किरण नवगिरे यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावले. मागील आठ दिवसांतील ही तिसरी तर महिन्यातील दहावी मंगळसूत्र चोरीची घटना आहे. पोलिस एकाही घटनेतील चोराचा शोध घेऊ शकले नाहीत. 


नवगिरे या रविवारी दुपारी साडेतीन वाजता एक लग्न समारंभातून घरी परतत होत्या. छत्रपतीनगरमधील कल्याणी बालक मंदिराजवळून जाताना मागून हेल्मेट घातलेला दुचाकीस्वार आला. संध्या यांच्या जवळ जाऊन त्याने गळ्यातील गंठणला झटका देत ओढले व पोबारा केला. संध्या यांचे पती किरण यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो वेगात निघून गेला. रात्री उशिरापर्यंत सातारा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. 


एकच चोर सक्रिय
रेखा काकडे (३०, रा.वृंदावन कॉलनी) यांचे मंगळसूत्र गुरुवारी याच पद्धतीने दुचाकीस्वाराने चोरले होते. मागील सर्व घटनांमध्ये एकाच पद्धतीने चोरी केल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी सातारा-देवळाईच्या डोंगराळ भागात खबऱ्यांकडून माहिती काढत होते, परंतु काहीही हाती लागले नाही. 

बातम्या आणखी आहेत...