आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांनी आठवड्यात पीककर्ज न दिल्यास फौजदारी कारवाई; जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत अाल्याने शेतकऱ्यांना २ वर्षांपासून पीक कर्ज मिळविण्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्वच राष्ट्रीयकृत बँकांना पीककर्ज देण्याचे आदेश देण्यात आले असून आलेली प्रकरणे आठवडाभरात मंजूर करण्यास सांगितले आहे. या वेळेत बँकेने ते मंजूर न केल्यास ग्राहक इतर बँकेत स्थलांतरीत केले जातील. तसेच संबंधित बँकेची नोंदणी रद्द करण्यासह प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचाही इशारा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.यांनी दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी बँकांकडे मोठ्या संख्येने अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


कर्जासाठी प्राथमिक प्रक्रिया करावीच लागणार 
राष्ट्रीयकृत बँकांकडे शेतकऱ्यांचे कर्ज खातेच नाही. त्यामुळे त्यांचे सात- बारा उतारासह इतर कागदपत्रे, सर्च रिपोर्ट, बोजा चढविणे ही प्रक्रिया करावीच लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांना सहकार्य करावे. शिवाय आपली प्रकरणेही त्वरीत मोठ्या संख्येने सादर करावी. कुठलीही बँक कर्ज देत नसल्यास जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. कर्ज उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी माझी आहे. 
- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी 

 

बातम्या आणखी आहेत...