आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इज्तेमाहून परतणाऱ्या लोकांची तुडुंब गर्दी; प्रचंड रेल्वे स्टेशन, बसस्टँडची यंत्रणा तोकडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- लिंबेजळगाव येथे आयोजित इज्तेमाहून परतणाऱ्या लोकांची रेल्वेस्टेशन,मध्यवर्ती बसस्टँड, सिडको बसस्टँड येथे तुडुंब गर्दी झाली होती. एवढ्या मोठ्या गर्दीसाठी येथील अन्नपाण्याची व्यवस्था तोकडी पडली. त्यामुळे भाविकांचे हाल झाले. ही बाब लक्षात आल्यानंतर शहरातील तरूणांनी रात्री दीडच्या सुमारास सात ते आठ गाड्या भरून अन्नपाण्याची सोय केली. 


दुपारी इज्तेमाची सांगता झाल्यानंतर लिंबेजळगावहून परतण्यासाठी भाविकांना वाहने मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पायीच रेल्वे स्टेशन, बसस्टँड गाठले. या दरम्यान अनेकांच्या रेल्वे, बस निघून गेल्या. काही भाविकांसोबत आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची चुकामूक झाली. फोनवरही संपर्क होत नसल्यामुळे ते गोंधळून गेले होते. रेल्वेने इज्तेमाच्या भाविकांसाठी जादा रेल्वेची व्यवस्था केली खरी परंतु एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध केली नाही. त्यामुळे बसस्टँड व रेल्वेस्टेशनवरील पाणी व अन्नपदार्थ लगेच संपले. ही बाब लक्षात आल्यानंतर शहरातील तरूण मदतीला धावले. पोलिसांनीही रेल्वेस्टेशन, बसस्टँडवर गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. 


३२ जणांना श्वसनाचा त्रास 
दरम्यान, लिंबेजळगावात धुळीमुळे ३२ भाविकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. १२ जणांना अतिसाराचा त्रासही जाणवल्याने त्यांच्यावरही घाटीत उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 


आधी पसरली चेंगराचेंगरी, बॉम्बस्फोटाची अफवा 
दुपारी कार्यक्रमस्थळाज‌वळ गवताला अाग लागल्यामुळे अफवांचे पेव फुटले आणि त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. लिंबेजळगाव इज्तेमात बॉम्बस्फोट हाेऊन चेंगराचेंगरी झाल्याची अफवा सोमवारी सकाळी औरंगाबादेत पसरली. त्यानंतर मुस्लिम भागातील महिलांनी घराबाहेर पडत आक्रोश सुरू केला होता. या अफवेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी सोशल मीडियातून शांततेचे आवाहन केले. तसेच मस्जिदमधूनही माहिती देण्यात आल्यानंतर त्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. 

बातम्या आणखी आहेत...