आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०११ मध्ये निर्लेप शेअर्स विक्रीचा निर्णय, तेव्हा कुठे होता जीएसटी? उद्योजक राम भोगले यांचे स्पष्टीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- निर्लेप अप्लायन्सेस कंपनीचे शेअर्स विकण्याचा निर्णय अाम्ही सन २०११ मध्ये घेतला होता. तेव्हा जीएसटी कायदा, नोटाबंदी आणि मोदी सरकारही अस्तित्वात नव्हते, अशी स्पष्टोक्ती निर्लेप समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राम भोगले यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली. 


निर्लेप विक्रीचा निर्णय जाहीर होताच उद्योगजगतात खळबळ उडाली. एका मराठी वृत्तपत्राने तर या विक्रीचा संबंध थेट नोटाबंदी आणि जीएसटीशी जोडला. भोगले यांनीच नोटाबंदी, जीएसटीमुळे निर्लेप विक्रीचा निर्णय घेतला, अशी माहिती दिल्याचे वृत्तही प्रसिद्ध केले. यासंदर्भात दिव्य मराठी प्रतिनिधीने संपर्क साधला असता भोगले यांनी स्पष्ट केले की, निर्लेपचे शेअर्स विकण्याचा निर्णय सात वर्षे आधीच झाला होता. त्यावेळी जीएसटी,नोटाबंदी कुठे होती ? त्यामुळे आमच्या या निर्णयाशी जीएसटीचा संबंध जोडण्याचे वृत्त पूर्णपणे खोडसाळपणाचे आहे. बजाज इलेक्ट्रिकल या मोठ्या ब्रँडसोबत आम्ही जोडलो गेलो, कारण आम्हाला जगाशी स्पर्धा करायची आहे. 


या निर्णयाचा जीएसटी, नाेटाबंदीशी संबंध जोडणे चुकीचे आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात असे निर्णय होतच असतात. ही साधारण बाब आहे. मात्र, निर्लेप हा ब्रँड मराठी माणसाशी त्यात आैरंगाबादशी जास्त जोडला गेला असल्याने लाेकांना हळहळ वाटणे साहजिकच आहे. या निर्णयातून पुढील काळात कंपनीची अपेक्षित असलेली भरभराटच होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...