आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या 16 दिवसांत दलित वस्त्यांतील प्रत्येक घर उजळणार, आंबेडकर जयंतीनिमित्त उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ ते ३० एप्रिलपर्यंत ग्राम स्वराज्य अभियान राबवण्यात येणार आहे. सौभाग्य योजनेतून दलित वस्त्यामध्ये शंभर टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. ही योजना केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सात गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील एकरूख, पंढरपूर तालुक्यातील आवे, सांगोला तालुक्यातील यलमर मंगेवाडी, मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी, अक्कलकोट तालुक्यातील कलकर्जाळ, हसापूर व किरनाळी या गावांचा समावेश आहे. या गावातील दलित वस्तीत शंभर टक्के विद्युतीकरण होऊन सर्व परिसर लखलख प्रकाशमय होणार आहे. 


या अभियानात राज्यातील १९२ गावांत सौभाग्य योजनेतून वीजजोडणी देण्यात येणार आहे. अधीक्षक अभियंता (संचालन व सुव्यवस्था) यांच्यावर ही जबाबदारी टाकून त्यांनी त्यांच्या मंडलाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी संबंधित विभागाचे प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता यांना दिले. यासाठी स्थानिक पातळीवरील जनमित्र, तंत्रज्ञ यांच्या मदतीने वीजजोडणी नसलेल्यांची आकडेवारी घेऊन ती तपासून त्यांना वीजजोडणी तत्काळ देण्यात यावी, असेही यावेळी सांगण्यात आले. 


३० एप्रिलपर्यंत कामे पूर्ण करण्याच्या सूचना 
ज्या खेडी, पाडे, वाडी व वस्तीतील ग्राहकांना महावितरणच्या पायाभूत सुविधेतून वीजजोडणी देता येत नाही अशा ग्राहकांची यादी तयार करून त्यांना अपारंपरिक पद्धतीने सौर ऊर्जेची वीजजोडणी देण्यात यावी. त्याप्रमाणे कृती कार्यक्रम तयार करून १९२ गावांत तातडीने वीजजोडणी देण्यासाठी ५ मे २०१८ ची वाट न बघता ३० एप्रिल २०१८ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...