आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरात दररोज अकरा बलात्कार, औरंगाबादेत अत्याचार प्रमाण घटले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देशभरात कठुआ आणि उन्नाव येथील बलात्काराच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली असताना महिलांवरील लैंगिक अत्याचाराबाबत औरंगाबादेतील चित्र  मात्र नियंत्रणात आहे. शहरात गेल्या ३ वर्षात महिलांवरील विविध प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या ३० टक्क्यांनी कमी झाली असून बलात्काराचे प्रमाणही घटले आहे. राज्यात दरराेज बलात्काराच्या ११ गुन्ह्यांची नोंद होते. तर अल्पवयीनांवरील गुन्ह्यांबाबत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर अाहे.   


लैंगिक अत्याचाराच्या एकूण गुन्ह्यापैकी ४३ टक्के गुन्हे अल्पवयीनांवर होतात. याबाबत जनआक्रोश वाढल्याने केंद्राने १२ वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी वटहुकूम काढण्याचा निर्णय घेतला आहे. अशा घटनांत  महाराष्ट्रही  आघाडीवर असल्याचे एनसीआरबीच्या आकडेवारी दर्शवते. एकीकडे ही स्थिती असताना औरंगाबादेत मात्र महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण घटल्याचे स्पष्ट होते. 


मानसिकता बदलणे गरजेचे

पुरोगामी आणि प्रगत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचा बलात्काराच्या बाबतीत अग्रक्रम लागणे क्लेषदायक आहे. केंद्राने कायद्यात बदल केल्याचे बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड.रेणुका घुले म्हणाल्या.

 

बलात्कार घटले 
औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २०१६ मध्ये बलात्काराच्या ६४ घटनांची नोंद झाली होती. २०१७ मध्ये हे प्रमाण ६० झाले आहे. म्हणजेच वर्षभरात लैंगिक अत्याचाराचे गुन्हे ४ ने कमी झाले आहेत. दुसरीकडे महिलांशी संबधित हत्या, हत्येचा प्रयत्न, कौटुंबिक छळ, विनयभंग, अपहरण, छेडछाड, आत्महत्येचा प्रयत्न या गुन्ह्यांमध्ये गेल्या ३ वर्षात तब्बल ३० टक्क्यांची घट झाल्याचे पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 

 

महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर 
औरंगाबादेत महिलांशी संबधीत अत्याचाराच्या घटनांत घट झाली असतांना राज्यात दररोज बलात्काराचे किमान ११ गुन्हे दाखल होत आहेत. अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या  गुन्ह्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात २०१६-१७ मध्ये पॉस्को कायद्याअंतर्गत २३१० गुन्हे नोंदवले गेले आहेत. तर १८ वर्षे वयोगटातील बलात्काराच्या गुन्ह्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात २४२९ गुन्हे नोंदवले गेले आहेत. 

 

१८ ते ३० मधील मुली टार्गेट 

२०१६-१७ मध्ये देशभरात ३९०६८ बलात्कारांच्या  घटनांची नोंद झाली. यापैकी १६८६३ (४३.२ टक्के) बलात्कार हे १८ वर्षाखालील अल्पवययीन मुलींवर झाले आहेत. १८ ते ३० वयोगटातील मुली हे आरोंपीचे टार्गेट आहेत. तब्बल ४२.१ टक्के बलात्कार या वयोगटातील मुलींवर झाले. तर ६० पेक्षा अधिक वयोगटाच्या ५७ महिला नराधमांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत. ९१ टक्के बलात्कारातील आरोपी ओळखीचा आहे. 

 

नोंद न झालेले गुन्हे अधिक 

^शहरात महिलांशी संबधित गुन्ह्यांची संख्या घटल्याचे आकडेवारी समाधानकारक आहे. मात्र, यातून हुरळून जाण्याचे कारण नाही. हे केवळ नोंद झालेले गुन्हे आहेत. लज्जा, ब्लकमेलींग, सामाजिक बहिष्कार आणि खुद्द पोलिसांच्या भीतीमुळे लैंगिक अत्याचाराचे कितीतरी गुन्हे पोलिस ठाण्यापर्यंत पोहचतच नाहीत. महिलांनी न घाबरता अशा प्रत्येक प्रकरणात पोलिसात फिर्याद दिली तर ही आकडेवारी खूप मोठी होईल.

- मथुरा मेवाड, स्त्रीवादी कार्यकर्त्या, औरंगाबाद

 

पुढील स्लाईडवर वाचा, २०१६-१७ मध्ये अल्पवयीनांवर बलात्कारांची आकडेवारी 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...