आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी वाऱ्याने धांदल,पत्रे उडाले;बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात गारपिटीने शेतकरी जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाडसावंगी- औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी परिसरात सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धावपळ उडाली होती. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची धांदल उडाली. काही घरावरील पत्रेही उडाल्याने वादळामुळे एकच गोंधळ उडाला होता.  येथील शेतकरी चंद्रभान त्र्यंबक चाळगे यांच्या घराच्या चारही रूमवरील पत्रे उडाले. सायंकाळी साडेपाच वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासोबतच जोरदार पावसाचा अंदाज असताना पाऊस झाला नाही.  वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाल्याने ते पत्रे शेजारील मैदानावर जाऊन पडले.  काही पत्रे झाडावर अडकले. त्यात घरातील संसारोपयोगी साहित्य विखुरले होते. विजेचे  साहित्य, फ्रिज, टीव्ही आदींचे नुकसान झाले. आता घरात चाळीस क्विंटल धान्य असून त्यात पावसाची शक्यता लक्षात घेता कुठे ठेवावे, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नुकसानीचा त्वरित पंचनामा करावा, अशी मागणी गाढे यांनी केली आहे.   


कन्नड तालुक्यात धांदल

कन्नड तालुक्यातील कळंकी परिसरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अक्षरश: झोप उडाली आहे. सकाळी सहाच्या सुमारास कळंकी, कोळवाडी, वडनेर येथे पावसाने हजेरी लावली होती. 


तळणीत शेतकऱ्यांची धावपळ

हवामान खात्याने शनिवारी गारपिटीसह जोरदार पावसाचा इशारा दिला होता. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी आणि परिसरातील देवठाणा, उस्वद, अंभुरा शेळके आदी भागात एकच धावपळ उडाली होती.

 

हिंगोलीत वाऱ्यासह पाऊस

शनिवारी सायंकाळी पाच वाजेनंतर विविध भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मोप येथे अंगावर वीज पडून एक बैल ठार झाल्याची घटना घडली. सेनगाव तालुक्यातील पिंपरी, सवना, गोरेगाव आदी भागांत अर्धा तास पाऊस झाला.

 

पाटोद्यात गारपिटीने एक गंभीर

बीड जिल्ह्यातील अाष्टी परिसरात दुपारी चारच्या दरम्यान वादळ वाऱ्यासह पाऊस झाला. तर पाटोदा तालुक्यातील अनपटवाडी येथील शेतकरी भीमराव मुकिंदा अनपट (७० वर्षे) हे शेतात काम करीत असताना गारपिटीमध्ये गंभीर जखमी झाला आहे. 

 

उस्मानाबाद येथे मेघगर्जना, परंडा येथे रिमझिम

उस्मानाबाद शहरात शनिवारी रात्रीच्या दरम्यान मेघगर्जनेसह सायंकाळी वादळी वारे सुटले. परंडा शहरासह परिसरात अचानक  विजेच्या कडकडाटासह ७.३० वाजता रिमझीम पाऊस बसरसला.  उस्मानाबाद येथे वादळी वाऱ्यामुळे तसेच विजेच्या लखलखाटामुळे पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे सातत्याने वीज गुल होत होती. नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. मात्र, वाऱ्यामुळे काही प्रमाणात तापमानात घट झाली. परंडा येथे पावसामुळे  नागरिकांची मोठी धावपळ उडाली. श्रीक्षेत्र सोनारी येथील भैरवनाथ यात्रा उत्सवास रविवारी सुरूवात होत आहे.  वातावरणामुळे यात्रेकरूना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...