आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीवर फ्लेमिंगोचे 15 वर्षांत प्रथमच दुर्मिळ दर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- जायकवाडी धरणावर जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीत स्थलांतरित पक्ष्यांच्या निरीक्षणात ठळकपणे आढळणारा पक्षी म्हणजे फ्लेमिंगो. यंदा मात्र हाच प्रमुख पक्षी जायकवाडी धरणात दुर्मिळ झाला अाहे. 


येथील पाणथळ अद्याप तयार झाले नाही. धरणातील या पक्षाचे प्रमुख खाद्य छोटे शिंपले, शेवाळ हे शेतीतील रासायनिक खताने संपल्याने फ्लेमिंगोने जायकवाडीकडे पाठ फिरवली अाहे. १५ ते २० वर्षांत हे पहिल्यांदाच झाले असल्याची माहिती पक्षी अभ्यासक डॉ. किशोर पाठक यांनी दिली.  जायकवाडी धरणावर दरवर्षी डिसेंबरदरम्यान लाखो फ्लेमिंगोंसह इतर पक्षी येतात. युरोप, लडाख, तिबेट, सैबेरिया, कच्छ, दक्षिण रशिया, इतर उत्तरेकडील भागातून हे पक्षी थंडीच्या काळात जायकवाडीत येतात. ते थंडी असेपर्यंत (मार्चअखेर) पर्यंत मुक्काम ठोकतात. यंदा मात्र जानेवारी अर्धा होत आला असला तरी प्रामुख्याने फ्लेमिंगो हा पक्षी तुरळकच दिसत आहे. 


इतर पक्षांत करोंचीसह अनेक पक्ष्यांची संख्या घटली असल्याची बाब पहिल्या पक्षिगणनेत काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झाली असली तरी यात फ्लेमिंगो हा पक्षी यंदा जायकवाडीत आला नसून बोटावर मोजता येतील एवढ्या संख्येत तो दिसला असल्याचे पैठणचे पक्षिमित्र संतोष गव्हाणे यांनी सांगितले. याचे कारण पक्षी अभ्यासक डॉ. किशोर पाठक यांना विचारले असता जायकवाडीत जे पाणथळ होते ते नष्ट होत असून तेथे शेती केली जाते. यात रासायनिक खताने पक्षाचे अन्न तयार होत नसल्याचे या दोन-तीन वर्षात समोर आले आहे. याचा फटका बसल्याने यंदा फ्लेमिंगो जायकवाडीत आले नसल्याचे दिसत असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...