आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात मोसमातील पहिली अतिवृष्टी; दोन तासांत ८४ मिमी कोसळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यात ९ जूनला मान्सुनचे आगमन झाले होते. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात २२ जूनपर्यंत औरंगाबादमध्ये फक्त ३७ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली होती. मात्र (२१ जून) गुरुवारी रात्री अवघ्या दोन तासात ८४ मिमी इतका अतिवृष्टी पाऊस झाला. रात्री १०.१० ते १०.५० या ४० मिनिटांत ७२ मिमी पावसाची नोंद एमजीएमच्या हवामान केंद्रात झाल्याचे हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. तर चिकलठाणा वेधशाळेत रात्री १० दहा ते ११.१५ पर्यंत ४८ मिमी तर गांधेली येथील एमजीएमच्या केंद्रात फक्त २ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी १३ सप्टेबरला पहिली अतिवृष्टी (४० मिनिटांत ७५ मिमी) झाली होती. 


५५ घरांत पाणी शिरले 
समतानगर नीता ड्रायव्हींग स्कूल जवळ जवळपास १५, फाजलपुऱ्यात ४० घरांमध्ये पाणी शिरले. तसेच तापडिया नाट्यमंदिरासमोरील काॅम्प्लेक्स, सिडको एन -७ येथील नरेंद्र हाऊसिंग सोसायटीत पाणी शिरल्यामुळे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. 


या भागांत साचली तळी 
जयभवानीनगर येथे नाल्याचे काम अर्धवट असल्याने रस्ता पाण्यासाली गेला होता. कटकटगेट, आझाद चौक, गजानन महाराज रोडवरील रिलायन्स माॅलसमोर, जवाहर काॅलनीतील चेतक घोडा चौक, बालाजीनगर, आकाशवाणीच्या मागील बाजूस असलेल्या विष्णूनगर, रोपळेकर हाॅस्पिटल चौक, झांबड इस्टेट, चेतनानगर चौक, भीमपुरा चौक, ज्योतीनगर चौक, भाजीवालीबाई चौक, देवानगरी, शहानूरवाडी आदी भागांत तळी साचली होती. 


अर्धे शहर अंधारात 
क्रांतीचौक, उस्मानपुरा, भीमपुरा, शहा काॅलनी, चौसर, ज्योतीनगर, प्रतापनगर, एकनाथनगर, हर्सूल, जटवाडा, व्दारकापुरी, नागसेननगर, कबीरनगर, शहानूरवाडी, विवेकानंदपुरम, महूनगर, शहासोक्त काॅलनी, क्रांतीनगर, पदमपुरा, बन्सीलालनगर, रेल्वेस्टेशन, हमालवाडा, राहुलनगर, जालाननगर, कोकणवाडी, राजनगर, वेदांतनगर, रेल्वे काॅलनी, काेहिनूर काॅलनी, एमजीएम ते सिडको एन -८ पर्यंतचा भाग अंधारात होता. किराडपुरा, रोशनगेट, बारी काॅलनी, अल्तमश काॅलनी आदी भागांत ९.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. १० नंतर तीव्रता वाढली आणि या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला. रात्री ११.३० पर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. मागील तीन दिवसांपासून उस्मानपुरा भागातील वीज सातत्याने खंडित होत आहे. 


या भागांत वीज सुरळीत: घाटी रुग्णालय, ज्युबलीपार्क, काचीवाडा, जयभीमनगर, प्रगती काॅलनी, गुलाबवाडी, बुढीलेन, सिटीचौक, आमखास, किल्लेअर्क, पंचशीलनगर, हर्षनगर, सिटीचौक, गुलमंडी, खडकेश्वर, मछलीखडक, पैठणगेट, बहादूरपुरा, कोतवालपुरा, सब्जीमंडी, स. भु. काॅलनी, नूतन काॅलनी, एन - १, २, ३ आदी भागांतील पुरवठा सुरळीत होता. 

बातम्या आणखी आहेत...