आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाशीच्या राणीसंबंधित पाच खोट्या बाबी, ज्या जगाला वाटतात खऱ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

17 जून 1858 रोजी इंग्रज सैन्याशी लढताना राणी लक्ष्मीबाई धारातिर्थी पडल्या होत्या. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. यानिमित्त आम्ही त्यांच्या वैशिष्‍ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व, दैदीप्यमान इतिहास आणि इतर पैलूविषयी तुम्हाला माहिती देणार आहोत. राणी लक्ष्मीबाई बाबत असे अनेक फॅक्टस् आहेत जे लोकांना खरे वाटतात पण इतिहासकारांच्या मते ते पूर्णपणे खोटे आहेत. आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला लक्ष्मीबाईंसंबंधित अशीच काही महत्तवाची माहिती देणार आहे....


लग्नाच्या वयाबाबतही बोलले गेले खोटे
- राणी लक्ष्मीबाईची जन्मतारीख 19 नोव्हेंबर 1835 मानली जाते. 
- इंग्रजांशी लढताना वयाच्या 23 व्या वर्षी त्यांना हौतात्म्य आले होते असे म्हटले जाते. 
- अनेक इतिहासकार याला सत्य मानत नाहीत. 
- 'झांसी क्रांति की काशी' पुस्तक लिहिणारे इतिहासकार ओमशंकर असर यांच्या मते 1835 मध्ये राणीचा जन्म झाल्याचा दावा चुकीचा आहे. झांशीचे राजा गंगाधर राव यांच्याशी झाशीच्या राणीचा विवाह 1842 मध्ये झाला होता. जर त्यांचा जन्म 1835 मध्ये झाला तर मग त्या विवाहावेळी केवळ 7 वर्षांच्या होत्या का? 
- राणीने लग्नापूर्वीच तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकली होती. एवढ्या कमी वयात ते शिकणे कठीण वाटते.


सत्य काय...
- ओमशंकर असर यांच्या मते, राणीचा जन्म 19 नोव्हेंबर 1827 ला झाला होता. 
- विवाहावेळी त्या 15 वर्षांच्या होत्या. 
- हौतात्म्य आले त्यावेळी त्यांचे वय जवळपास 31 वर्षे होते.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या झाशीच्या राणीबाबतच असेच दावे आणि प्रतिदावे...

बातम्या आणखी आहेत...