आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- देशाचे आरोग्य आयसीयुमध्ये आहे. बांगलादेश आणि नेपाळपेक्षा कमी खर्च भारतात आरोग्यावर खर्च केला जातो. एकीकडे देशातला शेतकरी आत्महत्या करत आहेत तर दुसरीकडे भारताचा सैनिक पाकिस्तानच्या गोळ्या खाऊन शहीद आहे. त्यामुळे आता पाकिस्तानसोबत चर्चा नको युद्ध हवे असे सांगत पाकिस्तानवर हल्ला करा, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी शनिवारी औरंगाबादमध्ये मांडली.
प्रवीण तोगडीया यांनी आज (शनिवारी) शहरातील अदालत रोडवरील जे.जे.हॉस्पिटलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर टिका केली. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्याविषयी ते म्हणाले, एकीकडे शेतकरी कर्ज घेवून मरत आहेत. तर सीमेवर 90 टक्के जवाना शेतकऱ्यांची मुले आहेत. ती पाकिस्तानच्या आतंकवाद्याच्या गोळ्या खाऊन शहीद होत आहेत. त्यामुळे पाकिस्तानवर टँक मिसाइलने हल्ला करत युद्ध करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून व्हिडिओमध्ये पाहा... जीएसटीसाठी रात्रीची संसद, मग राममंदिरासाठी का नको? डॉ. प्रवीण तोगडिया यांचा सवाल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.