आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळदीच्या कार्यक्रमात गरोदर महिलेला लथाबुक्क्यांनी मारहाण; अखेर महिलेचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पैठण गेट परिसरात हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या मारहाणीत एका गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंजुषा अजय कदम (वय-31) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद क्रांती चौक पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.

 

सूत्रांनूसार पैठण गेट येथील परिसरात 2 फेब्रुवारी रोजी हळदीचा समारंभ होता. गल्लीतील कार्यक्रम असल्यामुळे मंजुषा कदम यांचा पुतण्या शेखर कदम हा सहकार्य करत होता.
समारंभ चालू असताना अचानक शेखरला काही तरुणांनी मारहाण केली. शेखर यास मारहाण होत असतानाचे पाहून मंजुषा या त्याला सोडविण्यासाठी गेल्या असता तरुणांनी मंजुषा यांच्या पोटात लथाबुक्के मारले. मंजुषा जमिनीवरच कोसळल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. अखेर रविवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास मंजुषा यांचा मृत्यू झाला.मंजुषा या दोन महिन्यांच्या गरोदर होत्या.

 

मंजुषाचे पती अजय कदम हे मजुरी काम करतात. मंजुषाला त्यांना एक मुलगा, आईवडील असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...