आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाश आंबेडकरांनी ऐक्याचे राजे व्हावे, मी सरदार होईन; रामदास आठवलेंचा ऐक्यासाठी फॉर्म्युला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ऐक्यासाठी माझी भूमिका सकारात्मक आहे. सर्वांनी एकत्र यायला हवे. केवळ एका दिवशी एका स्टेजवर येऊन एेक्य होणार नाही. त्यासाठी फाॅर्म्युला तयार करावा लागेल. त्यासाठी दुय्यम स्थान स्वीकारण्याची तयारी आहे. मात्र पुन्हा गटबाजी होणार नाही याची काळजी समाजाने घेतली पाहिजे. प्रकाश आंबेडकरांशिवाय शक्तिशाली ऐक्य शक्य नसल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने ते रविवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.


आठवले म्हणाले, प्रकाश आंबेडकरांनी बंद पुकारला असला तरी त्या दिवशी लोकांच्या मनात संताप होता. त्यामुळे बंद पुकारला नसता तरी लोक रस्त्यावर आले असते. यामध्ये आरपीआयचे कार्यकर्ते आघाडीवर होते. प्रकाश आंबेडकर यांनी ऐक्याचे राजे व्हावे. मी सरदार व्हायला तयार आहे, असेही आठवले म्हणाले. 

 

सभेला विरोध करून गोंधळ
रिपब्लिकन नेत्यांनी ऐक्य करावे तसेच भीमा कोरेगाव घटनेनंतर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करत पुण्यातून आलेल्या समता सैनिक दलाच्या आंदोलकांनी आठवले यांच्या सभेला विरोध करत घोषणाबाजी केली. 

 

अवघ्या 7 मिनिटांत आटोपले भाषण...

तणावपूर्ण वातावरणात रामदास आठवले यांनी अवघ्या सात मिनिटात आपले भाषण आटोपते घेतले. आठवले म्हणाले, ऐक्य होणार होणार असेल तर माझा गट बरखास्त करण्याची माझी तयारी आहे. मात्र, केवळ एक दिवस स्टेजवर जाण्याचे नाटक मी करणार नाही. ऐक्यसाठी 'पॅंथर' बरखास्त करणारा मी कार्यकर्ता आहे. मी नेहमीच ऐक्याची भूमिका मांडणारा नेता आहे. पण एक दिवस एका मंचावर येऊन ऐक्य होणार नाही. त्यासाठी आधी ऐक्याचा फॉर्म्यूला तयार झाला पाहिजे. प्रकाश आंबेडकरांशिवाय हे ऐक्य शक्य नाही, असेही आठवलेंनी यावेळी सांगितले.

 

ऐक्य होणार असेल तर दुय्यम स्थान स्वीकारण्याचीही आपली तयारी आहे. पण केवळ माझे मंत्रिपद घालविण्यासाठी ऐक्य होणार असेल किंवा तशी अट घातली जात असेल तर ते आपल्याला मान्य नाही, असल्याचेही आठवले  यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...रामदास आठवलेंच्या सभेत उडालेल्या गोंधळाचे फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...