आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता होत्या राणी लक्ष्मीबाई, आजही इतिहासाची साक्ष देतो झाशीचा किल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई 17 जून 1858 मध्ये ब्रिटिश सैन्याशी लढताना धारातिर्थी पडल्या. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या त्या महाराणी होत्या. भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध 1857 मध्ये झालेल्या स्वातंत्र्य उठावातील त्या एक अग्रणी सेनानी होत्या. राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यामुळे त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ असे म्हटले जाते. आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने divyamarthi.com वाचकांना देत आहे त्यांच्या  किल्ल्याविषयीची माहिती...


झाशीचा किल्ला...
राणी लक्ष्‍मीबाई 1858 मध्‍ये इंग्रजांशी लढताना शहीद झाल्या. त्यांच्या शौर्याचे किस्से आजही लोकांमध्‍ये चर्चेचा विषय आहे. हेच शौर्य दाखवणारा झांशी राणी लक्ष्‍मीबाईंचा किल्ला आजही इतिहासाची साक्ष देतो. या ऐतिहासिक वास्तूतील एकेक भाग त्यांच्या शौर्यची साक्ष देते. एकाच वेळी इंग्रजांनी या किल्ल्यावर 60-60 तोफ गोळे डागले होते. तसेच त्यांनी अनेक वेळेस या वास्तूवर हल्लाही केला होता. या हल्ल्यानंतर आजही राणींचा किल्ला सन्मानाने उभा आहे. 


इ.स. 1613 मध्ये बांधणी...
ओरछाचा राजा वीर सिंह देवने 1613 मध्‍ये झाशीचा किल्ला बांधला होता. हा किल्ला बंगरा नावाच्या पर्वतावर उभा आहे. शेकडो वर्षे येथे मराठ्यांचे शासन होते. मात्र आजही शौर्यचे प्रति‍क म्हणून किल्ल्याला राणी लक्ष्‍मीबाई या नावाने ओळखले जाते.


1853 मध्‍ये लक्ष्‍मीबाई बनल्या झाशीच्या राणी...
वडील शिवरामभाऊ नंतर गंगाधर राव झाशीचा राजा बनला. विवाह झाल्यावर काही महिन्यांनी राणीने एका मुलाला जन्म दिला. परंतु त्याचा अकाली मृत्यू झाला. 1853 मध्‍ये राव यांच्या निधनानंतर लक्ष्‍मीबाई झाशीच्या राणी बनल्या होत्या.


एका वर्षाच्या आत राणीला सोडावा लागला किल्ला...
राजा गंगाधर राव यांच्या निधनापूर्वीच राणी लक्ष्मीबाईंनी एका मुलाला दत्तक घेतले होते. मात्र इंग्रजांनी दामोदर राव यांना दत्तक पूत्र मानण्‍यास नकार दिला होता. या कारणामुळे 28 एप्रिल 1854 रोजी राणी लक्ष्‍मीबाई यांना किल्ला सोडावा लागला. त्या ब-याच दिवसापर्यंत 'राणी महाल' मध्‍ये राहिल्या(पूर्वी या ठिकाणास शासकीय निवासस्थान म्हणून संबोधल जात असे. मात्र लक्ष्‍मीबाई येथे राहिल्याने या ठिकाणाला राणी महाल असे नाव पडले.).


1857 मध्‍ये पुन्हा किल्ल्यावर ताबा मिळवला
राणी लक्ष्‍मीबाईंना बंडखोर सैन्याने आपल्या नेत्या म्हणून मान्य केले. राणीने सैन्याच्या मदतीने इंग्रजांविरुध्‍द युध्‍द पुकारले. यात त्यांनी इंग्रजांना पळवून लावून 12 जून 1857 रोजी लक्ष्‍मीबाईंनी पुन्हा झाशी राज्य आणि किल्ल्यावर नियंत्रण मिळवले होते.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा राणी लक्ष्‍मीबाईंनी केव्हा झाशी आणि किल्ला सोडण्‍याचा निर्णय घेतला... (सर्व छायाचित्रे : राम नरेश यादव)

बातम्या आणखी आहेत...