आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकाला 1.35 लाख रूपये व्याजासह द्या, वीज ग्राहक तक्रार निवारण मंचचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महावितरणने चुकीचे वीज बिल आकारल्यामुळे ग्राहकाने त्यापोटी भरलेली १ लाख ३५ हजार ३३० ही अतिरिक्त रक्कम धनादेशाद्वारे व्याजासह परत करावी, असे आदेश महावितरणच्या वीज ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला. ग्राहकाच्या मीटरवरील योग्य नोंद न घेता चुकीचे बिल आकारून नोटीस न देता वीजपुरवठा खंडित केल्याबद्दल पाच हजार रुपये नुकसान भरपाई आणि सोलार नेट मीटर ग्राहकाने आणले असल्यामुळे त्याची रक्कमही परत देण्याचा आदेश मंचने दिला.

 

या प्रकरणी विश्वभारती कॉलनीतील डॉ. ज्योती दीपक गयाळ यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी घरावर ५ किलोवॅट क्षमतेची सोलार यंत्रणा बसवली. यासाठी महावितरणची मान्यता घेऊन सोलार नेट मीटर स्वतः विकत आणले. चाचणी विभागाकडून ते तपासून घेत घरावर बसवले. सोलार सिस्टिममुळे वीज बिल कमी येईल, अशी त्यांची अपेक्षा होती. पण महावितरणने मे १७ ते ऑगस्ट १७ या चार महिन्यांचे सरासरी २८२ युनिट वीज वापराचे बिल दिले. यात सोलारद्वारे निर्मित युनिटही दाखवले नाहीत. सप्टेंबर १७ मध्ये ९०७१ युनिटचा वीज वापर दाखवत एक लाख ६१ हजार ५३० रुपयांचे बिल देण्यात आले. हे बिल चुकीचे असल्याबाबत अनेक वेळा तक्रार करत बिल दुरुस्त करून देण्याची त्यांनी महावितरणकडे विनंती केली. त्यांच्या तक्रारीची दखल न घेता, बिल न भरल्याचे कारण पुढे करत वीजपुरवठा खंडित करण्यात आला. चुकीच्या वीज बिलाची पूर्ण रक्कम भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

 

बातम्या आणखी आहेत...