आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादत पाचव्या मजल्यावरुन उडी घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू, यामुळे उचलले होते पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एमआयटी नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी सचिन सुरेश वाघ याचा मृत्यू झाला आहे. 19 वर्षीय सचिनने मंगळवारी (10 एप्रिल) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास महाविद्यालय इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून म्हणजे सुमारे 60 फूट उंचीवरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कमलनयन बजाज रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना पहाटे 3.10 वाजता त्याचा मृत्यू झाला.

 

कॉपी करताना पकडला गेल्याने त्याने हा प्रकार केल्याचे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सातारा पोलिस स्टेशनमध्ये जमा होऊन महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

 

महाविद्यालयाचा दावा त्याला कॉपी करताना पकडले
एमआयटीचे महासंचालक प्रा. मुनीश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 9.30 वाजता न्यूट्रिशन बायोकेमिस्ट्री विषयाची प्री-युनिव्हर्सिटी टेस्ट सुरू झाली. पाऊण तासानंतर त्याच्याकडे कॉपी सापडल्याने त्याची उत्तरपत्रिका काढून घेत त्याला प्राचार्यांसमोर उभे करण्यात आले. त्याने दिलेल्या तीन मोबाइल क्रमांकांवर त्याच्या वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, पण तो अयशस्वी झाला. म्हणून त्याच्याकडून घडलेला प्रकार लिहून घेण्यात आला आणि बुधवारी परीक्षेसाठी ये, असे सांगितले.

 

मित्रांना फोन करुन सांगितले- मी आत्महत्या करतोय... 
सचिन महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावर गेला. तेथून त्याने एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या सौरभ रणदिवे व घराजवळील शुभम राठोड नावाच्या मित्राला तीन-चार कॉल केले. सौरभही परीक्षेत, तर शुभम काही कामात व्यग्र असल्याने त्यांनी त्याचा कॉल आधी उचलला नाही. थोड्या वेळाने दोघांनीही कॉल घेतले. तेव्हा त्याने मी आत्महत्या करत असल्याचे सांगितले.
दोन्ही मित्रांशी बोलणे होताच सचिनने पाचव्या मजल्यावरील जिन्याच्या जवळ असलेल्या काचेच्या खिडकीतून उडी मारली व तो मुख्य प्रवेशद्वाराच्या पोर्चवर म्हणजे पहिल्या मजल्यावर पडला. 

 

काही जणांनी व्हिडिओ काढला
तो खिडकीपाशी उभा असतानाच पोर्चजवळ उभ्या असलेल्या काही विद्यार्थ्यांनी त्याला रोखण्यासाठी आरडाओरड केली, तर काहींनी मोबाइलवर व्हिडिओ काढला. 

 

आत्महत्येपूर्वी मित्राला पाठवला मेसेज

उडी मारण्यापूर्वी म्हणजे मंगळवारी सकाळी 11 वाजून तीन मिनिटांनी सचिनने एका मित्राला पाठवलेला मेसेज असा.... 
भाऊ चेतन, यार मी खरं खूप स्टडी करत होतो, पण यार माझा फर्स्ट टाइम यार, माझ्या घरच्यांना खूप वाईट वाटेल यार, हे म्हणताय की तू सिक्स मंथ बॅकलॉगमध्ये पेपर दे, मी प्रिन्सिपलला सॉरी पण म्हणालो यार, पण ते माझं ऐकत नाहीये. तर मी आता सुसाइड करतो आहे. सॉरी यार, मला माहिती आहे की तुला हे आवडणार नाही. म्हणून नंतर सौरभला कॉल कर आणि त्याच्याकडून माझ्या घरच्यांचा नंबर घे. बाय. 

 

मी जिवाच्या आकांताने ओरडलो, पण...
या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आणि बालमित्र सौरभ या घटनेमुळे गांगरून गेला. तो म्हणाला, माझ्यासमोर माझ्या जिवलग मित्राने उडी मारली, यावर माझा विश्वासच बसत नाही. मी जेव्हा त्याच्या कॉलेजजवळ आलो तेव्हा तो मला पाचव्या मजल्याजवळ खिडकीत दिसला. मी वरती जाऊ की खाली थांबू, हे मला समजत नव्हते. मी जिवाच्या आकांताने ओरडत होतो. सगळी मुले त्याच्या मागे जा, असे सांगत होते. पण मी काही करण्याच्या आतच त्याने उडी मारली.

 

पुुुुढील स्लाइडसवर ‍क्लिक पाहा... सचिनने ‍मित्रांना फोन करून सां‍‍‍गितले, मी आत्महत्या करतोय...

बातम्या आणखी आहेत...