आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून काढली छेड, दोघांना मिळाली अशी शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून छेड काढणाऱ्या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. 


दिनेश लक्ष्मण घाटे (२२) आणि किशोर विष्णू शेजवळ (२३, दोघेही रा. राहुलनगर ) हे मनपा शाळेतील या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला प्रपोज करण्याचा प्रयत्न करत होते. तिने त्याकडे दुर्लक्ष केले. खटल्याची अंतिम सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांच्यासमोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. 

बातम्या आणखी आहेत...