आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार खैरे म्हणाले, सेनेत गट-तट नाहीत; मीही तसे करणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - खासदार चंद्रकांत खैरे यांची नेतेपदी निवड झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रथमच शहरात येत आहेत. तेव्हा जोरदार शक्तिप्रदर्शन झाले पाहिजे यासाठी सर्वांचेच जोमाने प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी सुभेदारी विश्रामगृहावर स्वागताची आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी 'साहेबांचे स्वागत भव्यच झाले पाहिजे' असे कार्यकर्त्यांना सांगतानाच शिवसेनेत कोणतेही गट-तट नाहीत आणि मी होऊही देणार नाही, असे ठामपणे सांगत यापुढे मी असे काहीही करणार नाही, असे खैरे यांनी स्पष्ट केले. मनपाच्या मंगळवारच्या सभेत सेनेत जे गट पडले होते त्यावर मात्र त्यांनी भाष्य केले नाही.

 

बैठकीस संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने आणि सुहास दाशरथे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व नरेंद्र त्रिवेदी, महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेते विकास जैन यांच्यासह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. घोसाळकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. त्याचबरोबर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी नियोजनबद्धपणे कसे कार्यक्रमासाठी यावे यावर मार्गदर्शन केले.

 

खैरे यांनी ठाकरे विमानतळावर आल्यानंतर ते शहरातून बाहेर पडेपर्यंत जागोजागी कसे जल्लोषात स्वागत झाले पाहिजे यासाठी कोणी काय करावे याबाबत सांगितले. तेव्हाच शिवसेनेत कोणतेही गट-तट नाहीत असे सांगतानाच यापुढेही गट-तट मी होऊ देणार नाही, असा दावा केला. बोलण्याच्या ओघात मी यापुढे असे काही करणार नाही, असेही ते सांगून गेले. करणार नाही म्हणजे यापूर्वी जे काही चालत होते ते ठरवूनच ना, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांत उमटली.

 

ठाकरे यांचा दौरा असा
११ वाजता विमानाने आगमन. येथून पैठणकडे रवाना. १२ वाजता शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ व शेतकरी मेळावा. तेथून घनसावंगी (ता. अंबड) रवाना, तेथे तीन वाजता शेतकरी मेळावा. अन्य कार्यक्रम आटोपून शहराकडे रवाना आणि सायंकाळी विशेष विमानाने मुंबईकडे प्रस्थान.

बातम्या आणखी आहेत...