आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईनेच चिमुकला रडत असल्याने घट्ट आवळले, त्यातच गेला त्याचा जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाटनांद्रा- पतीसोबत झालेल्या कौटुंबिक वादाचा राग मनात धरून जन्मदात्या आईनेच दहा वर्षाच्या चिमुकल्याला कडेवर घेऊन शेतात गेली तेव्हा चिमुकला रडू लागताच तिने त्याना अंगाशी घट्ट धरले यात गुदमरून चिमुकल्याचा जीव गेला. त्याची हालचाल होत नसल्याचे पाहून तिने त्याना चिमटा घेऊन पाहिला परंतू तो मृत झाल्याचे लक्षात आले. भितीपोटी पती व दिरावर आळ घेतल्याने   दोन दिवसांपुर्वी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासाअंती आईनेच चिमुकल्याची हत्या केल्याचे समोर आल्याने घाटनांद्रा (ता. सिल्लोड) येथील खुनाच्या या प्रकरणाला शुक्रवारी वेगळीच कलाटणी मिळाली आहे. कविता संदीप मोरे असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिला न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून तिची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.  


३१ मार्च रोजी कविता व तिचा पती संदीप मोरे यांच्यात कौटुंबिक वाद झाला होता. याचा राग मनात धरून तिने एक एप्रिल रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास कुणाला काही न सांगता तिचा मुलगा सागर ऊर्फ रुद्र (१०) याला घेऊन घराबाहेर पडली. दरम्यान, झोपेतून जागे झालेल्या मोरे कुटुंबीयांना बाळासह कविता घरात दिसली नसल्याने नातेवाइकांनी तिचा शोध घेतला. परंतु, न सापडल्याने  बाबूराव मोरे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. तक्रारीनंतर पोलिसांसह ग्रामस्थांनी पूर्ण दिवस तिला शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संध्याकाळी घाटनांद्रा गावालगतच्या नदीच्या किनाऱ्यावरून जात असताना काही लोकांना दिसून आली. त्यांनी तिला पकडून नातेवाइकांना  फोन करून  कविता सापडल्याचे  सांगितले. नातेवाइकांसह ग्रामस्थांनी  घटनास्थळी  जाऊन  तिला  पोलिसांच्या  उपस्थितीत ताब्यात  घेतले. परंतु, तिच्याजवळ मुलगा सागर दिसून  न आल्याने मुलगा कुठे आहे, असे विचारल्यावर  तिने  हंबरडा  फोडला आणि बाळाचे हे खून प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून सागरचा खून तिचा पती संदीप व दीर किशोर काशीनाथ मोरे यांनी केल्याचे सांगितले.  वाळूत बाळाला पुरलेले घटनास्थळ दाखवले. माहेरच्या मंडळींसह ग्रामस्थांनी मृत बाळाला बाहेर काढले होते. 

बातम्या आणखी आहेत...