आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवनेरीतील पाण्याची बाटली, वृत्तपत्र दीड महिन्यापासून बंद; प्रवाशांमध्ये नाराजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमधून प्रवास करणाऱ्यांना पाण्याची बाटली आणि वर्तमानपत्र देऊन कस्टमर डिलाइट योजना सुरू करण्यात आली होती. या सुविधेमुळे प्रवाशांमध्ये वेगळा आनंद होता. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून ही योजना बंद केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. 


एसटी महामंडळ साडेतीन वर्षांपासून कस्टमर डिलाइट योजना राबवत आहे. या अंतर्गत शिवनेरी बसने प्रवास करणाऱ्यांना तिकीट काढताच २०० मिलीची पाण्याची बाटली आणि वर्तमानपत्र दिले जात असे. १८ टक्के भाडेवाढ करताच प्रवाशांना देण्यात येणाऱ्या या सुविधाही रद्द करण्यात आल्या. औरंगाबाद ते पुणे मार्गावर शिवनेरीने प्रवास करणारे ७० वर्षीय रामचंद्र चितळे म्हणाले की, महामंडळ सन्मानाने वर्तमानपत्र व छोटीशी पाण्याची बाटली देते यात एक वेगळेच समाधान होते. ती बंद करून महामंडळाने काय साधले? योजना बंद करायची होती तर मग सुरूच का केली असा सवाल ज्योती पाटील यांनी केला आहे. 


दीड महिन्यापासून बाटल्यांचा स्टॉक आला नाही 
दिव्य मराठीने मध्यवर्ती बस स्थानकावरील प्रवाशांशी बातचीत केली. शिवाय शिवनेरीचे तिकीट देणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, गेल्या दीड महिन्यापासून पाण्याची बाटली व वर्तमान पत्र आमच्याकडे येणे बंद झाल्याने आम्ही प्रवाशांना ते देऊ शकत नाही. आगार प्रमुख अनिल भुसार म्हणाले, ही योजना वरूनच बंद झाली आहे. कारण दीड महिन्यापासून पाण्याच्या बाटल्यांचा स्टॉक आमच्याकडे आलेला नाही. 


शिवनेरीचे भाडे ७७५ रुपये 
औरंगाबाद ते पुणे मार्गावर शिवनेरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या गाडीचे भाडे पूर्वी ६२५ रुपये होते ते आता ७७५ करण्यात आले आहे. 


प्रवाशांना अडचणी 
१८ टक्के भाडेवाढ करून एसटी महामंडळाने सुविधाही बंद केल्या. शिवाय या बसचे बुकिंग करण्यासाठी भलीमोठी रांग असते. अनेकदा बुकिंग क्लर्क गायब असतो. बसस्थानकात प्यायला पाणी नाही. 

बातम्या आणखी आहेत...