आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावला अाॅनलाईन शेतमाल लिलाव सुरू; राष्ट्रीय कृषी बाजार याेजनेची अंमलबजावणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव- येथील बाजार समितीच्या मुख्य अावारात साेमवारी (दि. १८) राष्ट्रीय कृषी बाजार (इ-नाम) याेजनेंतर्गत अाॅनलाईन पद्धतीने शेतमाल लिलावाचा शुभारंभ करण्यात अाला. मका, धान्य व अन्य शेतमालाचे अाॅनलाईन लिलाव हाेऊन शेतकऱ्यांना अधिक भाव मिळणे शक्य हाेणार असल्याने सदर याेजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याची माहिती सभापती राजेंद्र जाधव यांनी दिली. 


इ-नाम याेजनेत मालेगाव बाजार समितीचा समावेश झाला अाहे. स्थानिक व्यापाऱ्यांसह ज्यांनी अाॅनलाईन नाेंदणी केली अाहे, असे राज्यभरातील बाजार समित्यांचे व्यापारी व खरेदीदार शेतमाल खरेदीसाठी बोली लावू शकणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अधिक भाव मिळणार आहे. मिळणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा हाेतील. इ-नाम योजनेच्या कार्यप्रणालीप्रमाणे बाजार समितीमध्ये आलेल्या सर्व शेतमालाची इ-नाम पोर्टलवर लॉट मॅनेजमेंट, गेट एन्ट्री, शेतमालाची गुणवत्ता तपासणी, इ-ऑक्शन, शेतमालाच्या वजनाची नोंद, ऑनलाईन पेमेंट व आगाऊ गेट एन्ट्रीप्रमाणे ऑनलाईन कामकाज होणे अपेक्षित आहे. विक्रीस अाणलेल्या मालाची लॅबमध्ये तपासणी झाल्याने शेतमालाची प्रतवारी निश्चित हाेऊन चांगला बाजारभाव मिळू शकेल. शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करून शेतमालाची विक्री करावी, असे अावाहनही सभापती जाधव यांनी केले. शुभारंभप्रसंगी उपसभापती सुनील देवरे, सदस्य वसंत काेर, इ-नामच्या निरीक्षक प्राजक्ता वाडीकर, ऋषिकेश पवार, व्यापारी असाेसिएशनचे अध्यक्ष भिका काेतकर, सचिव अशाेक देसले यांच्यासह शेतकरी व व्यापारी उपस्थित हाेते. 


शेतकऱ्यांना अाॅनलाईन नाेंदणी अावश्यक 
अाॅनलाईन लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनाही अापल्या नावाची अाॅनलाईन नाेंदणी करणे गरजेचे अाहे. यासाठी बंॅक पासबुक झेराॅक्स, अाधारकार्ड झेराॅक्स, माेबाईल क्रमांक ही कागदपत्रे बाजार समिती नाेंदणी कक्षात जमा करावी, असे अावाहनही करण्यात अाले. 

 

बातम्या आणखी आहेत...