आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधाची 'करणी', तरीही आज 7 सिनेमागृहांत 'पद्मावत'चे शो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित "पद्मावत' हा चित्रपट गुरुवारी शहरातील सात मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्या सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, तिथे पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक आणि कर्मचारी असा बंदोबस्त राहील, असे सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले खरे मात्र या चित्रपटाला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मागणाऱ्या चित्रपटगृह व्यवस्थापनाकडे पोलिसांनी पैसे मागितल्यामुळे बंदोबस्ताबस्ताबाबत चित्रपटगृह व्यवस्थापन साशंक आहे. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित झाला तर आंदोलन करू, अशा निवेदनाद्वारे इशारा देणाऱ्यांना १४९ कलमान्वये नोटीस बजावली आहे.

 

पोलिस आयुक्त 'आऊट' असताना पोलिसांचे ऑपरेशन
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शहर पोलिसांनी बहुतांश चौकांत आॅलआऊट ऑपरेशन राबवले. संशयित तसेच बाहेरगावाहून आलेली वाहने, लॉज यांची तपासणी केली. दरम्यान, बुधवारी पोलिस आयुक्त यादव एका दिवसाच्या सुटीवर असल्यामुळे पदभार विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे होता. त्यांनीही बंदोबस्ताचा आढावा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

रात्री १०.४५ पर्यंत शो
शहरातील ७ मल्टिप्लेक्समध्ये पद्मावतचे ३६ शो आहेत. काही सिनेमागृहांत सकाळी नऊ ते रात्री पावणेअकरापर्यंत शो आहेत. या शोची माहिती संबंधित संकेतस्थळावर असून ऑनलाइन बुकिंगही झाल्याचे दिसते. याशिवाय सिंगल स्क्रीनमध्येही वेगळे शो आहेत.

 

करणी सेनेची आज धरणे
'पद्मावत'विरोधात राजपूत करणी संघटनेचे पदाधिकारी गुरुवारी सकाळी ११ वाजता गजानन महाराज मंदिर चौकात धरणे आंदोलन करणार आहेत. हिंदू व राजपूत संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

बातम्या आणखी आहेत...