आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पवयीन कबड्डीपटूवर प्रशिक्षकानेच केला अत्याचार, असे समोर आले सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- पंधरावर्षीय कबड्डीपटू मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रशिक्षक मंगेश गवळी यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. पीडितेच्या अठरा आढवड्याच्या अर्भकाच्या डीएनए चाचणीवरून अत्याचार केल्याचे सिद्ध झाले. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाआधारे गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद करून शिक्षा सुनावली. 


हनुमाननगर परिसरातील पीडित कबड्डीपटू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बारामती येथे गेली होती. स्पर्धेनंतर परतल्यावर १० मे २०१५ रोजी तिने पोटात दुखत असल्याचे आईला सांगितले. आईने तिला खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी ही बाब पीडितेसह तिच्या आईला सांगितली. मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता बारामती येथे संतोष नावाच्या तरुणाने अत्याचार केले असल्याचे तिने सांगितले. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो बारामती ठाण्यात वर्ग केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता स्पर्धेच्या कालावधीत संतोष नावाचा तरुण तेथे आला नसल्याचे समोर आले. दरम्यान, महिला पोलिस उपनिरीक्षक एम. बी. लाड यांनी कसून चौकशी केली असता हनुमाननगरातील उर्वरित पान.६ 


तपासादरम्यान केला गर्भपात 
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पीडिता १८ आठवड्यांची गर्भवती होती. घाटी रुग्णालयात गर्भपात करून त्या अर्भकाचा डीएनए तपासण्यासाठी नमुने घेण्यात आले. पीडिता, मंगेश आणि अर्भकाच्या डीएनएची तपासणी कलिना येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत केली असता त्यामध्ये अर्भक हे मंगेशचे असल्याचा अहवाल प्राप्त झाला. 

बातम्या आणखी आहेत...