आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ राज्यांमधील 60 जिल्ह्यांत पावसात घट, तापमानात वाढ; राज्‍यालाही फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयातर्फे संसदेत नुकत्याच सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात हवामान बदलाची अनेक धक्कादायक निरीक्षणे आहेत. १९७० च्या तुलनेत मागील दशकात (२००५ ते २०१५) मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा, झारखंडच्या ६० पेक्षा जास्त जिल्ह्यांत तापमानात ०.२५ ते ०.७५ अंश सेल्सियस एवढी वाढ झाली आहे. याच जिल्ह्यातील पावसाचे प्रमाणही ५० ते ५०० मिमीपर्यंत घटले आहे. यात महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांचा समावेश आहे.  


आर्थिक सर्वेक्षणानुसार यात १९७० आणि २००५ ते २०१५ या दशकातील नोंदीची तुलना करण्यात आली आहे. त्यानुसार पावसाच्या बाबतीत सर्वाधिक चिंताजनक स्थिती मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, केरळ व ईशान्येकडील राज्यांची आहे. येथील पावसाचे प्रमाण ५० ते ५०० मिमीने कमी झाले आहे. प्रामुख्याने ६० जिल्ह्यांवर हवामान बदलाचा मोठा परिणाम दिसतो आहे. 

 

अकोला @ ३९.५ अंश सेल्सियसवर

मार्चच्या सुरुवातीलाच अकोला शहरात शुक्रवारी देशात सर्वाधिक ३९.५ अंश सेल्सियस तापमानाची नाेंद झाली. शनिवारी दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा ३८.६  अंश सेल्सियसवर स्थिरावला. राज्यात अकोला शहरानंतर जळगाव, परभणी, ब्रह्मपुरी आणि वर्धा येथे ३९ अंश सेल्सियसची  तापमानाची नोंद झाली आहे.  अकोला शहर समुद्रसपाटीपासून ३१५ मीटर उंचीवर आहे. तसेच तूर्तास हवामानही कोरडे असल्याने तापमान वाढल्याचे हवामान तज्ज्ञ रवींद्र पाटील म्हणाले. तर डॉ. रामचंद्र साबळे यांच्या मते, २३ मार्चनंतर तापमान वाढेल.

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, राज्‍यांचा बदललेला मान्‍सून पॅटर्न...

 

 

बातम्या आणखी आहेत...