आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२३ जूनला 'स्वच्छ भारत'चा निकाल, कचराकोंडीमुळे कमी गुण मिळण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातून शहरे पाणंदमुक्त आणि कचरामुक्त करण्यासाठी तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा घेण्यात येत आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात या स्पर्धेत देशभरातील चार हजार ४१ शहरांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचा निकाल २३ जूनला जाहीर होणार आहे. स्मार्ट सिटीच्या सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात २०१६ मध्ये ७३ शहरांचा समावेश होता. तेव्हा औरंगाबाद ५६ व्या क्रमांकावर होते. त्यानंतर २०१७ मध्ये एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ४३४ शहरांचे स्वच्छ सर्वेक्षण झाले. यात दोन हजार गुणांची स्पर्धा होती. ज्यात महाराष्ट्रातील ४४ शहरांपैकी भुसावळ वगळता पहिल्या ५० शहरांच्या यादीत क्रमांक मिळवता आला नाही. 


औरंगाबाद शहर २९९ क्रमांकावर होते. या वेळी स्वच्छ सर्वेक्षणात राज्यातून किमान २० शहरांत क्रमांक मिळवण्यासाठी औरंगाबाद महापालिकेने धडपड केली. मात्र, कचरा कोंडीने त्यावर पाणी फेरले जाणार आहे. दोन वर्षांत मनपाने कचरा प्रक्रियेसाठी कोणतीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे गुणांकन घसरणार आहे. मध्यंतरी देशभरातील स्वच्छ सर्वेक्षणात उल्लेखनीय कार्य केलेल्या ५० शहरांचा निकाल केंद्राने घोषित केला. आता २३ जूनला उर्वरित शहरांचा निकाल घोषित होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...