आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणा आर्केडमध्ये घरफोडी करणारी टोळी गजाआड; भिंगारनाल्यात फेेकली होती तिजोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- गजबलेल्या तारकपूर परिसरातील प्रेरणा आर्केड शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये घरफोडी घरणारी टोळी तोफखाना पोलिसांनी गजाआड केली. फेब्रुवारी २०१८ मध्ये ही घरफोडी झाली होती. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला दोन लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तिजोरी फोडल्यानंतर ती बुरूडगाव रोड परिसरातील भिंगारनाल्यात फेकून आरोपी पसार झाले होते. अखेर या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. 


अय्युब कासम सय्यद (रा. घासगल्ली, कोठला झोपडपट्टी) व अजयसिंग पोपटसिंग परदेशी अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी प्रेरणा आर्केडमधील आर. आर. कपूर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात घरफोडी केली होती. तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यांच्या पथकाने आरोपींना तारकपूर परिसरातून अटक केली. त्यांची अधिक चौकशी केली असता टकलू ऊर्फ इसरार शेख व वसीम शेख हे घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार असल्याचे समाेर आले. आरोपी अजयसिंग परदेशी हा आर. आर. कपूर कंपनीत कामाला होता. मालक गावाला गेल्याचे बघून त्याने घरफोडीचा डाव आखला होता. कपाट दुरुस्त करणारा अय्युब सय्यद यालाही गुन्ह्यात सामिल करून घेण्यात आले. सर्वांनी मिळून २२ ते २३ फेब्रुवारी २०१८ च्या दरम्यान हा गुन्हा केला. गुन्ह्यात वापरलेले हातोडी, कटावणी व अवजड तिजोरी घेऊन जाण्यासाठी वापरलेली इंिडका गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपींनी तिजोरी फोडून नंतर ती भिंगारनाल्यात फेकून दिली होती. तिजोरीतील रोख रक्कम व सोने आपसात वाटून घेतल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सपकाळे, पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने यांच्या पथकाने ही कारवाई केली. 


व्यसनासाठी दुचाकी चोरणारा जेरबंद 
व्यसनासाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संबंधित आरोपी विधीसंघर्षित असून त्याला दिल्लीगेट परिसरातून ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशी केली असता चोरी केलेल्या दुचाकी नगर-कल्याण रोड परिसरातील गणेशनगर येथे राहणाऱ्या एका नातेवाईकाच्या घरामागे लपून ठेवल्या होत्या. व्यसनासाठी लागणाऱ्या पैशांची व्यवस्था म्हणून दुचाकींची चोरी करत असल्याची कबुली त्याने दिली. 

बातम्या आणखी आहेत...