आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत एकनाथ महाराजाच्या पालखीचे पंढरपूरला प्रस्थान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- आम्हा आवडे नाथ, पांडुरंग नाही आम्हा भेदभाव या अभंग प्रमाणे आज नाथ वंशजाचा नाथांच्या पादुका वरून तासभर चाललेली कागदी घोड्यांची नौटंकी पोलिसांच्या मध्यस्थीने विनावाद एक तासाने नाथाच्या पादुका दत्तकपुत्र रघुनाथ बुवा पांडव यांच्याकडे देऊन पडदा टाकला. नाथ वंशजाच्या वाद- विवादानंतर ही हजारो भाविक वारकरी पालखी सोहळ्यास व पंढरपूरसाठीच्या पायी दिंडीत सहभागी होण्यासाठी पैठण नगरीत दाखल झाले होते. 


दुपारी १२ वाजता रघुनाथ बुवा पालखीवाले यांनी पालखी नाथ मंदिराबाहेर आणली. सुरुवातीला नाथवंशज हरिपंडित गोसावी यांनी कोर्टाचे पत्र आणा तरच पादुका देतो हा मुद्दा उपस्थित केल्याने एक तासभर मंदिरातच पादुकाचा विषय सुरू होता. यात पोलिस निरीक्षक चंदन ईमले यांनी तुमचा वाद चालू द्या, पण भाविक वारकऱ्यांना वेठीस धरू नका, अशी विनंती केली त्यावर या नाथ पादुका पालखीत विधिवत ठेवण्यात आल्या. 


त्यानंतर या पादुकाची टाळ मृदुगाच्या व संत एकनाथ भानुदासच्या गजरात संत एकनाथ महाराज यांच्या पादुकाची नाथवाड्यातून मिरवणूक काढत पालखी ओट्यावर या पादुका भाविकाच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. भक्तिरसाने चिंब झालेला वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात पांडुरंग एकनाथ भानुदासाच्या नामघोषात गुरुवारी शांतीब्रह्म संत एकनाथाच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. यंदा पहिल्यांदाच या दिंडी सोहळ्यात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आल्याने हा पालखी सोहळा अनोखा ठरला. ही पालखी सूर्यस्तासमयी पंढरपूरकडे प्रस्थान झाली. माझे जिवाची आवडी,पंढरपुरा नेईल गुढी या अभंगाप्रमाणे आज औरंगाबाद-जालना, परभणीसह पैठण तालुक्यातील हजारो वारकरी सकाळपासूनच पैठण नगरीत दाखल झाले होते. 


वादाच्या पार्श्वभूमीवर शंभरच्यावर पोलिस बंदोबस्त 
मागील अनेक वर्षांपासून नाथवंशज व दत्तक रघुनाथबुवा पालखीवाले यांच्याकडे पालखी पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान आला आहे. तर या पालखीत नाथाच्या पादुका असतात त्या सध्या नाथवंशज हरिपंडित गोसावी यांच्याकडे असून त्यांनी दिंडीपर्यंत रघुनाथबुवाकडे त्या पालखीसाठी द्याव्या असे आदेश असून ते आदेश घेऊन यावे यासाठी आज पादुका एक तास उशिरा रघुनाथबुवांकडे हरिपंडित गोसावींनी दिल्या. दरम्यान दोन दिवसांपूर्वी रघुनाथबुवा पालखीवाले व नाथवंशज हरिपंडित गोसावी यांना सूचना देऊन वाद करू नये अशा नोटीस दिल्या होत्या. याच वादाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात ९ पोलिस अधिकारी व शंभर पोलिसाच्या बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिरा बाहेर पादुका पोलिस बंदोबस्त काढण्यात आल्या. या वेळी मंदिरात नाथवंशज हरिपंडित गोसावी, पुष्कर महाजन, सरदार महाजनसह रघुनाथबुवा पालखीवाले, रेखाताई कुलकर्णी, श्रीकृष्ण कुलकर्णी, सायली कुलकर्णी यांच्यासह नाथवंशजांची उपस्थिती होती. 


गोदावरीच्या पाण्यातून वारकऱ्यांना चनकवाडीला जावे लागले 
नाथ पालखीचा पहिला मुक्काम आज पैठण तालुक्यातील चनकवाडी येथे होता. पालखी ओट्यावरून दिंडी ही प्रतिष्ठान काॅलेजच्या मागून जाते येथे गोदावरीचे नदीपात्र असून वारकऱ्यांना या पाण्यातून जावे लागले. येथील पुलाचे काम मागील दहा ते बारा वर्षांपासून रखडल्याने वारकऱ्यांना गोदावरीच्या नदी पात्रातून जीव धोक्यात घालून जावे लागले. 

बातम्या आणखी आहेत...