आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथ्यांदा आयात शुल्क वाढवल्याने सोयाबीनला ४ हजार भाव मिळणार; पाशा पटेल यांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औेरंगाबाद- सोयाबीनला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत चार वेळा खाद्यतेलावरचे आयात शुल्क वाढवले आहे. तसेच सोयाबीनच्या पेंडीला सात टक्के निर्यात शुल्कसाठी इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे यावर्षी सोयाबीनला चार हजार रुपये इतका भाव मिळेल, असा दावा कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला. दिल्लीतून सर्व केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. 


राज्यात एक कोटी ४९ लाख हेक्टरमध्ये खरिपाचा पेरा होणार आहे. त्यापैकी ८० लाख हेक्टरवर कापूस आणि सोयाबीनचा पेरा होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी असल्यामुळे त्यांचा विचार गांभीर्याने करण्यात येत आहे. पाशा पटेल यांनी सांगितले की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच वर्षातून चार वेळा खाद्यतेलावर आयात शुल्क वाढवले आहे. दर तीन महिन्यात याबाबत एकदा बैठक होते. यापूर्वी सोयाबीन क्रूड ऑइलवर ऑगस्टमध्ये ७.५ टक्के तर रिफाइन क्रूडवर १२.५ टक्के आयात शुल्क होते. चार वेळा हे आयात शुल्क वाढवल्यानंतर ती क्रूड पाम ऑइल ४४ रिफाइन पाम ऑइलवर ५४ टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे. तर क्रूड सूर्यफूल २५ टक्के आणि रिफाइन सूर्यफूल ३५ टक्के होती. यामध्ये आणखी वाढ करण्याची मागणी केली होती. आता त्यामध्ये वाढ होऊन ३५ टक्के क्रूड आणि ४५ टक्के रिफाइन इतकी वाढली आहे. त्यामुळे त्याचा फायदा सोयाबीनला भाव मिळण्यासाठी होणार आहे. 


सोयाबीन पेंड निर्यात होणार 
सोयाबीनची किंमत तेलावर निघत नाही. यामध्ये एक क्विंटल सोयाबीनमधून १८ किलो तेल निघते तर उर्वरित पेंड निघते. देशात २३० लाख मेट्रिक टन तेल लागते. यामध्ये ७० लाख मेट्रिक टन आपण तयार करतो. तर १५० लाख मेट्रिक टन आयात करतो. जगभरातल्या ३९ टक्के शिल्लक तेलापैकी १९ टक्के आपण आयात करतो. यासाठी देशातल्या तेल उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे. आम्ही केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री पीयूष गोयल तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. सोयाबीनची पेंड देशाच्या बाहेर गेली पाहिजे हे समजावून सांगितले. 


पेंड पाठवण्यासाठी स्वतंत्र मालगाडीची मागणी 
२०१२ मध्ये ४५ लाख मेट्रिक टन सोयाबीन पेंड निर्यात झाली. गेल्या वर्षी ती १२ लाख टनापर्यंत आली होती. त्यामुळे किमान दहा टक्के निर्यात करण्यासाठी इन्सेंटिव्ह द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र आता सात टक्के इन्सेंटिव्ह देण्याचे मान्य झाले आहे. त्यासाठी बांगलादेश आठ लाख मेट्रिक टन पेंड खरेदी करण्यास तयार आहे. त्यासाठी रँक उपलब्ध करून दिले तर रेल्वेच्या माध्यमातून पेंड पाठवण्यासाठी एक मालगाडीच देण्याची मागणी गोयल यांच्याकडे केली असल्याचे पटेल यांनी सांगितले. त्यामुळे पेंडीची निर्यात झाल्यास ४२०० पर्यंत शेतकऱ्यांना भाव मिळेल, असेही पटेल यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...