आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद विभागात चार मुख्य पोस्ट कार्यालयांत पासपोर्ट सेवेला सुरुवात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -प्रादेशिक पोस्ट विभागातील औरंगाबाद, जालना, बीड आणि नांदेड पोस्ट मुख्य कार्यालयांत पासपोर्ट मिळण्यास सुरुवात झाली आहे. महिन्याभरात जळगाव व लातूर म्हणजेच एकूण सहा मुख्य पोस्ट कार्यालयातून मागेल त्याला व नियम अटीत बसणाऱ्यांना आता पासपोर्ट मिळण्याचा मार्ग सुखकारक झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.


औरंगाबादसह संपूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यांतील नागरिक मार्च २०१७ पूर्वी पासपोर्टसाठी औरंगाबाद पोलिस आयुक्त कार्यालयात येत होते. दलालांच्या मदतीने अर्ज भरण्यासाठी पहाटे पाच वाजेपासून रांगेत उभे राहावे लागत होते. त्यानंतरही मुंबई पारपत्र कार्यालयात खेटे मारावे लागायचे.

 

वेळेत पासपोर्ट मिळत नसल्यामुळे बऱ्याचदा विदेशात जाण्याच्या संधीला मुकावे लागत असे. व्यापार व्यवसायाला पाहिजे तशी चालना मिळत नव्हती. या विषयी तक्रारी प्रचंड वाढल्या होत्या. परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली. यात मोदी यांनीच लक्ष घातल्याने गतवर्षी २८ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील दुसरे व मराठवाड्यातील पहिले स्वतंत्र पोस्ट पासपोर्ट सेवा केंद्र औरंगाबादेत कार्यान्वित करण्यात आले. 


नागरिकांचा वाढता प्रतिसाद : पासपोर्ट घेणाऱ्यांची मागणीही  वाढली. याचा विचार करून काही प्रमुख शहरात वर्षभरात पासपोर्ट केंद्रांत वाढ करण्याचा निर्णय पोस्ट विभाग, परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचनेनुसार घेण्यात आला होता.  त्यामुळे मराठवाड्यात दीड महिन्यात  जालना, बीड, परभणी येथील मुख्य पोस्ट कार्यालयात स्वतंत्र पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर महिनाभरात लातूर आणि जळगाव म्हणजेच औरंगाबाद  प्रादेशिक पोस्ट विभागात एकूण सहा स्वतंत्र पोस्ट पासपोर्ट कार्यालये कार्यान्वित होणार आहेत. 

 

३६५ दिवसांत ३० हजार अर्ज निकाली

 छावणी (औरंगाबाद) पोस्ट कार्यालयात सर्व प्रथम २८ मार्च २०१७ रोजी स्वतंत्र पोस्ट पासपोर्ट केंद्र सुरू झाले. प्रथम ५० अर्ज निकाली काढण्यात येत होती. ही सेवा गतिमान होत गेली. एका दिवशी अडीचशेवर  अर्ज निकाली काढण्यात आले. एकूण ३६५ दिवसांत ३० हजारांवर  अर्ज निकाली काढली. विविध शहरांत  केंद्र सुरू झाल्याने  शहरातील नागरिकांसाठी अधिक फायदेशीर ठरेल, असे पोस्ट मास्तर जनरल प्रणव कुमार यांनी सांगितले.

 

१५२ पोस्टांत आधार सेवा 

प्रादेशिक विभागातील १५२ पोस्ट कार्यालयांत नवीन आधार कार्ड अन् आधार कार्डातील दुरुस्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे. नवीन आधार कार्डसाठी काही खर्च नाही. मात्र, आधार कार्डातील चुका, नाव, फोटो आदी सुधारणा करण्यासाठी २५ रुपये शुल्क आकारले जाते. 

 

पुढील स्लाईडवर पहा अधिक माहिती......

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...